Davorlim Chhatrapati Sambhaji Maharaj Statue Dispute Dainik Gomantak
गोवा

छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटविण्याचा प्रश्नच येत नाही! जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मान्य करु

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue Dispute: पुतळा व मंदिराचा स्तंभ यामध्ये अडीच मीटरची जागा; पालखी परिक्रमेस कोणताही अडथळा येण्याची शक्यता नाही

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: पुतळा व मंदिराचा स्तंभ यामध्ये अडीच मीटरची जागा आहे व पालखी परिक्रमेस कोणताही अडथळा येण्याची शक्यताच नाही. अशा परिस्थितीत रुमडामळ-दवर्ली येथील मारुती मंदिराच्या आवारात फेब्रुवारी महिन्यात उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटविण्याचा प्रश्र्नच उद्भवत नाही.

त्याचप्रमाणे हे प्रकरण सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याने जिल्हाधिकारी यासंदर्भात जो निर्णय घेतील, तो आम्ही मान्य करू, असे ‘संभाजी’प्रेमींतर्फे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विनायक वळवईकर यांनी सांगितले.

पुतळ्यासाठी सुरक्षित जागा!

हा पुतळा इथेच का, याबद्दल बोलताना विनायक वळवईकर यांनी सांगितले की, ही जागा मारुती मंदिर ट्रस्टची असल्याचे ट्रस्टचे पदाधिकारी सांगतात. सध्या रुमडामळ परिसरात बेकायदेशीर कामांना ऊत आला आहे. त्यामुळे संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ही जागा आम्हाला सुरक्षित वाटली.

जर हा पुतळा बेकायदेशीर आहे तर मग मारुती मंदिर ट्रस्टच्या सभागृहाखाली पार्किंगच्या जागेऐवजी आणखी एक सभागृह करण्यात आले आहे. ते बेकायदेशीर नाही का? जे पहिल्या मजल्यावर सभागृह आहे त्याला मारुती मंदिर ट्रस्टचे सभागृह असे नाव द्यायचे सोडून बाबू नायक सभागृह असे का दिले, असा प्रश्र्नही वळवईकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT