Goa News DainikGomantak
गोवा

Goa News: अभिमानास्पद! गोव्यातील तरुणाला 'अद्वैतवेदान्त रत्न' उपाधी, अशी पदवी मिळवणारा पहिला गोमंतकीय

Goa Updates: दक्षिण गोव्यातील पैंगीण येथील दत्तानुभव टेंग्से यांनी वेदांत शास्त्रामध्ये संपूर्ण अद्वैतवेदांत शास्त्राची महापरीक्षा देऊन 'अद्वैतवेदान्त रत्न' ही उपाधी प्राप्त केली

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा: दक्षिण गोव्यातील पैंगीण येथील दत्तानुभव (राघव) गुलाब टेंग्से यांनी वेदांत शास्त्रामध्ये संपूर्ण अद्वैतवेदांत शास्त्राची महापरीक्षा देऊन रविवारी (दि.२७) रोजी 'अद्वैतवेदान्त रत्न' ही उपाधी कांची शंकराचार्यांकडून प्राप्त केली.

राघव टेंग्से यांनी रिवण,गोवा येथील श्रीविद्या पाठशाळेत पं. देवदत्त पाटील व पं. राजेश्वरशास्त्री देशमुख यांच्याकडे न्यायशास्त्राचे अध्ययन पूर्ण केले असून चेन्नई येथून महामहोपाध्याय पं. मणिद्राविड गुरुजींकडून वेदांत शास्त्राचे अध्ययन पूर्ण केले आहे.

भारतात सहा दर्शनशास्त्रांमधून ही परीक्षा घेतली जाते. आधी शास्त्रपोषक सभा या नावाने घेतली जाणारी हीच परीक्षा आता कांची वेदवेदांत शास्त्रसभा या नावाने सुरु आहे. सहा वर्षांच्या अभ्यासक्रमाला अनुसरून भारतात विविध ठिकाणी याचे अध्ययन सुरु आहे. सहा वर्षांच्या अध्ययनानंतर टप्याटप्याने काही परीक्षा घेतल्या जातात आणि शेवटी महापरीक्षेनंतर शास्त्रानुसार पदवी प्रदान केली जाते.

दत्तानुभव टेंग्से यांनी दुसऱ्या टप्प्याची परीक्षा उत्तीर्ण केली असल्याने त्यांना 'अद्वैतवेदान्त रत्न' ही उपाधी बहाल करण्यात आलीये. शास्त्राचे अधिकाधिक अध्ययन करण्यासाठी अशा पदव्यांची मदत मिळते असे दत्तानुभव टेंग्से म्हणाले.

परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गोव्यात वेदांत शास्त्रातील अद्वैतवेदान्त रत्न ही पदवी मिळवणारे दत्तानुभव टेंग्से हे पहिले शास्त्राचे अभ्यासक ठरले आहेत. वर्ष २०१८ पासून त्यांची या परीक्षेसाठी तयारी सुरु होती, मात्र मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे काहीकाळ उशीर झाला अशी माहिती दत्तानुभव टेंग्से यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT