Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: ‘डार्कवेब’ ड्रग्स रॅकेट गोव्यापर्यंत; एनसीबीचे देशभर छापे

राज्यातील एका तरुणासह सहाजणांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs Case: देशात विविध प्रकारच्या ड्रग्स तस्करीचे जाळे दिवसेंदिवस वाढतच आहे. तस्करीचे आंतरराष्‍ट्रीय रॅकेट डार्क वेबद्वारे चालविले जात आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) डार्क वेबद्वारे देशभर ड्रग्सचे रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील देशभरातून गोव्यातील तरुणासह ६ जणांना अटक केली.

संशयितांकडून सुमारे १५ हजार एलएसडी ब्लॉट्स व २.५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिल्लीतील एका महिलेसह गोवा, केरळ, नोयडा, उत्तर प्रदेश या राज्यातील संशयिताचा समावेश आहे.

नोयडा येथे खासगी विद्यापीठात शिकणाऱ्या गोव्यातील तरुणाला अटक झाल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे हे डार्कनेट ड्रग्स तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे गोव्यापर्यंतही पोहचल्याने पोलिस यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले आहे.

अशी केली कारवाई:-

1) देशातील विविध भागातून एलएसडीची तस्करी कुरियर व टपाल सेवेतून होत असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. त्यामुळे या तस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ही यंत्रणा काम करत होती.

2) सोशल मीडियाचा वापर करून ही तस्करी कशाप्रकारे डार्क वेबद्वारे होत होती, याची परिपूर्ण माहिती स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने मिळवली. त्यातून नोयडा येथे एका खासगी विद्यापीठात शिकत असलेल्या गोव्यातील तरुणाच्या कारवायांवर नजर ठेवण्यात आली.

3) त्याला ताब्यात घेतल्यावर एलएसडी ड्रग्सचा साठा ‘विक्र’ या नावाने मेसेज करून मागविला होता. काश्‍मीर येथील एका ग्राहकाला तो पाठवणार होता. त्याच्या माहितीच्या आधारे दिल्लीतील एका तरुणाला अटक करून त्याच्याकडूनसुमारे 650 एलएसडी ब्लॉट्स जप्त केले होते.

पुण्यातही ड्रग्सची विक्री
या कारवाईवेळी एनसीबीने या रॅकेटमध्ये गुंतलेल्या दिल्लीतील एका तरुणीला ताब्यात घेतले. मात्र, तिच्याकडे ड्रग्स सापडला नसला तरी तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिचा असलेल्या साथीदाराला जयपूर (राजस्थान) येथून अटक केली.

त्याच्याकडे 9006 एलएसडी ब्लॉट्स व 2.23 किलो गांजा मिळाला. हा साठा तो पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे पाठवणार होता, अशी कबुली दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT