Goa Tourist Rash Driving  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist Rash Driving: गोव्यात काहीही केले तरी चालते? एन्जॉयच्या नावाखाली पर्यटक तरूणींचा 'रेंट अ कार'मधून धोकादायक प्रवास

व्हिडिओ व्हायरल; कारवाईची गरज

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Tourist Rash Driving: गोवा म्हटले पर्यटकांची एकच भावना असते ती म्हणजे एन्जॉय. तथापि, गोव्यात एन्जॉयच्या नावाखाली काहीही केलेले चालते का? असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती दिसून येते.

कारण काही पर्यटकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून कसेही वर्तन करण्याचे प्रकार दृष्टीस पडत असतात. नुकतेच असे दोन व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये दिसते की, कारमधून तसेच जीपमधून जात असलेल्या पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले आहेत. यातून ते स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत.

विशेष म्हणजे, रेंट अ कार या सुविधेतून घेतलेल्या गाड्यांमध्ये हे सुरू आहे. त्यामुळे अशा पर्यटकांची माहिती घेऊन, त्यांच्यावर कारवाई करणे शक्य आहे.

एका व्हिडिओत दिसते की, कारच्या पाठीमागील सीटवरून दोन्ही बाजूंच्या खिडक्यांतून दोन मुली चालत्या कारमधून आपले डोके बाहेर काढून चिअरअप करताना दिसतात.

पर्यटकांना ही एन्जॉयमेंट वाटत असली तरी, हे धोकादायक असून स्वतःसह इतरही वाहनधारकांना त्यातून धोका निर्माण होऊ शकतो.

तर आणखी एका व्हिडिओमध्ये जिप्सी गाडीतून चाललेल्या मुली दिसतात. त्यात एक मुलगी जिप्सीच्या पाठीमागील एक्स्ट्रा असलेल्या जादाच्या टायरवर (स्टेपनी) बसलेली दिसते.

हे दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यातील दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. त्यातूनच गोव्यात एन्जॉयच्या नावाखाली काहीही केले तरी चालते, या समजुतीला आळा बसू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

SCROLL FOR NEXT