JCB Demolition tensilefacades.com
गोवा

Aldona Market: धोकादायक हळदोणा मार्केट इमारत पाडणार; सरपंच डिसोझा

Dangerous Market Building: जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश मिळाल्यानंतर या इमारतीचे बांधकाम पाडले जाईल, अशी प्रतिक्रिया सरपंच आश्विन डिसोझा यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: संततधार पावसामुळे इमारतीमधील साहित्य हटविण्यास आडकाठी होत असल्याने, हळदोणा मार्केटमधील विक्रेत्यांनी केलेली मुदतवाढीची मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर, जीर्ण व मोडकळीस आलेली धोकादायक हळदोणा मार्केट इमारत शनिवारी अखेर सील करण्यात आली.

पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश मिळाल्यानंतर या इमारतीचे बांधकाम पाडले जाईल, अशी प्रतिक्रिया सरपंच आश्विन डिसोझा यांनी दिली.

सरपंच पुढे म्हणाले, इमारत पूर्णतः असुरक्षित तसेच धोकादायक स्थितीत होती. अशा अपायकारक स्थितीत इमारतीमधील व्यवहार सुरू ठेवणे अयोग्य होते. एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? संबंधित इमारत मोडण्याची कायदेशीर परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. ती मिळताच, पुढील आठवड्यात इमारत जमीनदोस्त केली जाईल.

सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी या इमारतीच्या संरचनेचे काही काँक्रिट कोसळल्यानंतर शुक्रवारी पंचायतीकडून इमारत परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. चोवीस तासांत ही जागा खाली करण्याचा आदेश जारी नोटिसीतून येथील विक्रेत्यांना दिला होता, असे असूनही आज शनिवारी सकाळी बाजारातील व्यवहार नित्यानुसार सुरूच होते. काही विक्रेत्यांनी बाजारात बसून आपला व्यवसाय केला.

बाजारातील सर्व व्यावसायिकांनी शनिवारी सकाळी आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांची भेट घेत, याविषयी चर्चा केली. आपण सर्वांना सुरक्षेच्या कारणास्तव इमारत परिसर खाली करण्याची केलेली सूचना विक्रेत्यांनी मान्य केल्याची माहिती फेरेरा यांनी दिली. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पावले उचलण्यात आली असून लवकर पुनर्वसन करण्याचे आश्वासन संबंधितांना देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'! भारतीय जहाजांसाठी होर्मुजचा मार्ग मोकळा; इराणकडून भारताल विशेष सवलत

SCROLL FOR NEXT