Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: विश्‍‍वजीत राणे यांच्‍या दिल्लीवारीमुळे पुन्‍हा राजकीय चर्चा! अमित शाह, संतोष यांची घेतली भेट

Goa Cabinet Expansion: खात्रीलायक माहितीनुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मंत्री विश्‍‍वजीत राणे यांना पुढील आठवड्यात पक्षश्रेष्ठींकडून दिल्लीत बोलावले जाणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्‍यानंतर आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी आपल्‍या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची भेट घेतली. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा गोव्‍यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मंत्री विश्‍‍वजीत राणे यांना पुढील आठवड्यात पक्षश्रेष्ठींकडून दिल्लीत बोलावले जाणार आहे. त्याचवेळी मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय मार्गी लावण्यात येईल.

भाजप आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात अद्याप भाष्य केलेले नाही. प्रत्येक नेत्याच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू होते. बी. एल. संतोष हे गोव्‍याच्या दौऱ्यावर आले असता त्यांची अनेक नेत्यांनी भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांशी तर त्यांनी दोन वेळा चर्चा केली होती. सर्वसमावेशक असा अहवाल त्यांना सादर केल्याचे नाईक यांनी म्हटले होते.

दरम्‍यान, दामू नाईक यांची पंतप्रधानांशी झालेली ही पहिली भेट असली तरी यापूर्वी विश्‍‍वजीत राणे यांनी अमित शहा आणि बी. ए. संतोष यांची भेट घेतली होती.

चार मंत्र्यांना बदलण्‍याची शक्‍यता

या सर्व घडामोडींचा अर्थ मंत्रिमंडळ फेरबदलाशी लावला जात आहे. चार मंत्री बदलले जातील अशी सत्ताधारी गोटातच चर्चा सुरू आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाची गरज जाहीरपणे व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT