Damodar (Damu) Naik Dainik Gomantak
गोवा

Goa: ‘आप’ सत्तेवर येणारच नाही; दामोदर नाईक

आपकडून गोमंतकीय जनतेची फसवणूक

दैनिक गोमन्तक

पणजी: आम आदमी पक्ष गोव्यात (AAP Goa) सत्तेवर येणारच नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही घोषणेची अंमलबजावणी करण्याची वेळ येणार नाही. यासाठीच ते कोणत्याही घोषणा करत सुटले आहेत, अशी टिका भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक (BJP Damodar Naik) यांनी काल (बुधवारी) पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, आम आदमी पक्ष निवडणूक असेल तिथे हीच गोष्ट करतो. दिल्लीमध्ये त्यांनी काय केले आहे ते सांगत नाहीत. आम्ही हे करू ते करू असे मात्र ते सांगत असतात. गोवा सरकारचा अर्थसंकल्प हा 20 हजार कोटी रुपयांचा तर दिल्लीचा 70 हजार कोटी रुपयांचा आहे. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असल्याने तेथील खर्चाची, कल्याणकारी योजनांची जबाबदारी भाजपचे केंद्र सरकार घेते. गोमंतकीय जनतेला याची माहिती आहे. गोवाही 1987 पर्यंत केंद्रशासित प्रदेश होता, तेव्हा दिल्लीहून निधी मिळत होता. आता राज्य असल्याने केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यांसाठी असलेल्या तरतुदीतून निधी वाट्याला येतो. केंद्रशासित प्रदेशांसारखा राज्यांची जबाबदारी केंद्र सरकारवर नसते.

आधी सरकारी नोकऱ्या देतो असे आपवाले सांगत होते, आता जॉब फॉर ऑल असे सांगून सरकारी की खासगी नोकऱ्या याबाबत संदिग्धता ठेवत त्यांनी हा विषय गुंडाळून टाकला आहे. 2.7 कोटी लोकसंख्येच्या दिल्लीत ते केवळ पाचशे सरकारी नोकऱ्या देऊ शकले आहेत यावरून त्यांच्या कार्यक्षमतेची कल्पना यावी. मात्र बुद्धीभेद करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही, असेही दामू नाईक म्हणाले.

दिल्लीत आप सपशेल अपयशी

व्यवसाय सुलभता, रोजगार निर्मिती या आघाड्यांवर आपचे दिल्लीतील सरकार सपशेल अपयशी ठरले आहेत. ख्यातनाम माध्यमांत त्याविषयी छापून आलेले आहे. त्याविषयीची माहितीही भाजपने नव्हे, तर अन्य एका पक्षाने माहितीच्या अधिकारात संकलीत केली आहे. याचा अर्थ आपकडून गोमंतकीय जनतेची फसवणूक सुरू झाल्याचे दिसते. ते दिल्लीत हे केले ते केले असे सांगतात; पण प्रत्यक्षात तेथे काहीच केलेले नाही, असे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT