Damodar Mauzo  Dainik Gomantak
गोवा

Damodar Mauzo: 'सरकारी कामकाज केवळ कोकणीतूनच...', मावजोंच्या वक्तव्यावरुन उसळली संतापाची लाट; समाज माध्यमांवरही उमटले पडसाद

Konkani Language: राजभाषा कायद्यात मराठी नको, हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभरातील मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राजभाषा कायद्यात मराठी नको, हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभरातील मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मावजो यांना सन्मानाने निमंत्रित केले होते. ‘मावजो, आपल्याविषयीचा आदर आता मावळला आहे’, अशा तीव्र शब्दांत काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, तर त्यांचा निषेध करण्यासाठी तालुका पातळीवर मराठीप्रेमी एकवटू लागले आहेत.

सरकारी कामकाज केवळ कोकणीतूनच व्हावे, यासाठी राजभाषा कायद्यात केवळ कोकणीचा समावेश असावा, मराठीचा समावेश तेथे नसावा, असे मत मावजो यांनी व्यक्त केले आहे. त्यानंतर त्यांच्याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होणे सुरू झाले.

‘मराठी असे आमुची मायबोली’ या व्हॉटस ॲप गटावर दिवसभर याच विषयाची चर्चा सुरू असून मावजो यांच्याविरोधातील आंदोलनांचे नियोजनही तेथे होऊ लागले आहे. चंद्रशेखर गावस यांनी यांनी समाज माध्यमावर नमूद केले आहे, की, एखाद्या माणसाला साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळाला याचा अर्थ तो ज्ञानी असतो, असा होत नाही. आणि हे तो मुक्ताफळं उधळून स्वतःच सिद्ध करतो. ज्ञानपीठ पुरस्काराचा अपमान कसा करावा तो असा.

...मी काहीही चुकीचे बोललो नाही!

राजभाषा कायद्याची जी व्याख्या आहे, त्यानुसार गोव्यात ९५ टक्के लोक जी भाषा वापरतात, ती राजभाषा. या तत्त्वानुसार कोकणी हीच गोव्याची राजभाषा असून मराठीला तो दर्जा मिळूच शकत नाही. त्यामुळे गोव्याची राजभाषा ही फक्त कोकणी हे माझे ठाम मत आहे, अशी प्रतिक्रिया दामोदर मावजो यांनी व्यक्त केली. मी काहीही चुकीचे बोललो नाही, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT