Minister Deepak Kesarkar 
गोवा

गोव्यातील कोकणी X मराठी वादात महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांची उडी, काय म्हणाले वाचा...

Goa Konkani X Marathi Controversy: भाषेवरुन विनाकारण वाद निर्माण करु नये, असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

Pramod Yadav

Konkani X Marathi Controversy Writer Damodar Mauzo Statement

पणजी: साहित्यिक दामोदर मावजो यांनी मराठीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गोव्यात सध्या वाद सुरु आहे. गोव्याच्या राजभाषा कायद्यात मराठीचा समावेश नको, असे वादग्रस्त विधान कोकणी साहित्यिक मावजो यांनी केले.

यावरुन राज्यात कोकणी विरुद्ध मराठी वादाने तोंड वर काढले आहे. यात आता महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उडी घेतली असून गोमंतकीय महत्वाचे आवाहन केले आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांच्या वक्तवरुन राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. मावजो यांनी चुकीचे वक्तव्य केल्याचे मत मराठीप्रेमींनी व्यक्त केले आहे.

यात आता महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उडी घेतली आहे. गोमंतकीयांनी कोकणी आणि मराठी या दोन्ही भाषांचा सन्मान राखावा. भाषेवरुन विनाकारण वाद निर्माण करु नये, असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

मावजो यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. गोवा मराठी अकादमीच्या वतीने म्हापसा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले.

कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी मराठीबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. मावजो भारतीय भाषांबाबत द्वेष ओकणारे पहिले ज्ञानपीठ विजेते साहित्यक असल्याचे त्यांच्या विधानातून स्पष्ट होते, असे गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी म्हटले.

'सरकारी कामकाज केवळ कोकणीतूनच व्हावे. यासाठी राजभाषा कायद्यात कोकणीचा समावेश असावा, मराठीचा समावेश असू नये', असे मत मावजो यांनी व्यक्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT