Dalgado Konkani Akademi Dainik Gomantak
गोवा

Dalgado Konkani Akademi: दाल्गादो’ची नवीन कार्यकारिणी

सेल्सो फर्नांडिस अध्यक्ष: 6 सदस्यांची बिनविरोध निवड

गोमन्तक डिजिटल टीम

दाल्गादो कोंकणी अकादमीच्या घटनेनुसार अध्यक्षपदाच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. पीठासीन अधिकारी ॲड. प्रीतम लोटलीकर यांनी सेल्सो फर्नांडिस यांना अध्यक्ष म्हणून घोषित केले. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.

सेल्सो यांना 130 पैकी 127 मते मिळाली. याआधी अफॉन्सो ब्रागांझा, फा. अल्फ्रेड वाझ, डॅनियल एफ. डिसौझा, फा. मायरन जेसन बार्रेटो, विलियम फर्नांडिस आणि साव्हियो पिंटो यांनी कार्यकारिणीच्या सदस्यपदासाठी अर्ज दाखल केले होते. केवळ 6 सदस्यांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

ॲड. प्रीतम लोटलीकर यांनी अध्यक्षांसह सात नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. सोमवारी (ता. 6) झालेल्या नवीन समितीच्या पहिल्या बैठकीत अध्यक्ष सेल्सो फर्नांडिस यांनी विलियम फर्नांडिस यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. मायरन जेसन बार्रेटो यांची सचिवपदी तर अफोंसो ब्रागांझा यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली.

अध्यक्षांनी एकत्रितपणे एकमताने तोमाझीन कार्दोझ, प्रेमानंद ए. लोटलीकर, विन्सी क्वाद्रुस आणि असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणारे तिओतिनियो कोस्ता या चार सदस्यांची नावे सुचविली. उत्तर आणि दक्षिण गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुक्रमे डॉ. ग्लेनिस मेंडोसा आणि सोनिया गोम्स या दोन महिलांना सदस्यत्व देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT