Daji Salkar Dainik Gomantak
गोवा

Vasco Maimollem lake : 'या' तळ्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार; दाजी साळकरांनी दिले एवढे कोटी रुपये

'अमृत सरोवर' अभियानाअंतर्गत तळ्याच्या पुनरुज्जीवनाला मान्यता

गोमन्तक डिजिटल टीम

Daji Salkar : वास्को येथील मायमाेळे तळ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 'अमृत सरोवर' अभियान अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मायमाेळे तळे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण हा माझा 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे. त्यामुळे तो पूर्ण व्हावा, यासाठी माझ्याकडून सर्व प्रयत्न केले जातील, लवकरच मायमाेळे तळे एक पर्यटनस्थळ म्हणून रुपाला येईल, असे आमदार दाजी साळकर यांनी स्पष्ट केले.

"आसपासच्या लोकवस्तीतील सांडपाणी मायमोळे तळ्यात सोडण्यात येऊ लागल्याने त्याचे एका मोठ्या डबक्यामध्ये रूपांतर झाले आहे. तळ्याचा विकास व सौंदर्यीकरण हे प्रत्येक निवडणुकीचा जाहीरनामातील एक मुद्दा असतो. मात्र, सौंदर्यीकरण झालेच नाही. या तळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी मी पाठपुरावा केला आहे तसेच मंत्री सुभाष शिरोडकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे योग्य सहकार्य मिळाल्याने तळे लवकरच एका आगळ्यावेगळ्या रुपात वास्कोवासीयांना पाहण्यास मिळणार आहे. या ठिकाणी कोणत्या सुविधा असाव्यात इत्यादी गोष्टींसाठी प्रकल्प सल्लागारची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी कदाचित गोव्याबाहेरील सल्लागाराची मते घेण्यात येणार असल्याचे साळकर यांनी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यात एक कोटी मंजूर झाले आहे. जसजसे काम पुढे सरकत जाईल तशी आणखी किती निधीची गरज आहे ते स्पष्ट होईल. मायमोळे तळे हे कोमुनिदादच्या मालकीचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ना हरकत दाखला मिळाला पाहिजे. यासंबंधी मी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे चर्चा केली होती. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रकल्प सौंदर्यीकरण, पर्यावरणपूरक व सरकारचा असल्याने कोमुनिनादची सर्व परवानगी मिळेल, यात वाद नाही. या प्रकल्पाचा लाभही कोमुनिदादला मिळेल. ज्या काही अडचणी असतील त्यावर योग्य तोडगा काढण्यात येईल, असे साळकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT