Illegal Petroleum Storage Dainik Gomantak
गोवा

पत्र्याच्या मागे 'खेळ चाले', पेट्रोलियम पदार्थांची अवैध साठवणूकप्रकरणी दाबोळीत पोलिसांची कारवाई; दीड कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Illegal Petroleum Storage: पेट्रोलियम पदार्थांची अवैधरित्या साठवणूक, हाताळणी करण्यात येत असल्याबद्दल पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी छापा टाकून सुमारे दीड कोटी रुपये किमतीचे टिप्पर, टँकर आणि पेट्रोलियम पदार्थ जप्त केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: दाबोळी येथे एका हॉटेलसमोरच्या मोकळ्या जागेत पेट्रोलियम पदार्थांची अवैधरित्या साठवणूक, हाताळणी करण्यात येत असल्याबद्दल पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी छापा टाकून सुमारे दीड कोटी रुपये किमतीचे टिप्पर, टँकर आणि पेट्रोलियम पदार्थ जप्त केले. ही कारवाई सुमारे सहा तास चालली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाबोळी येथील एका हॉटेलसमोरच्या मोकळ्या जागेत पेट्रोलियम पदार्थांची अवैध साठवणूक व हाताळणी करण्यात येत असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. यावर कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले.

इंधन साठवणूक व हाताळणीचे ठिकाण निश्र्चित झाल्यावर तेथे छापा टाकण्यात आला. यावेळी तेथे सहा इंधनवाहू टँकर आणि एक टिप्पर ट्रक असल्याचे दिसून आले. त्या सर्व वाहनांची तपासणी केली असता, इंधनवाहू टँकरमध्ये ज्वलनशील पेट्रोलियम द्रवपदार्थ साठविलेला आढळला.

सर्व टँकरमधील पेट्रोलियम पदार्थांचे नमुने घेतल्यावर ते सीलबंद केले. ते नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. ही सर्व वाहने जप्त केली असून वाहनांसह पेट्रोलियम पदार्थांची किंमत सुमारे दीड कोटी रुपये होते.

या ठिकाणी साठविलेले पेट्रोलियम पदार्थ अवैधरित्या काळ्या बाजारात पाठविण्यात येत होते. या अवैध साठवणुकीमुळे परिसरातील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अवैधरित्या पेट्रोलियम पदार्थ हाताळणी तसेच साठवणूक करणे याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

जीवबा दळवी यांच्या देखरेखीखाली टाकलेल्या या छाप्यात उपअधीक्षक सूरज हळर्णकर, पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर, परेश नाईक, विकास देयकर, हवालदार नवीन वालेकर, शिपाई सुशांत पागी, यशवंत गावकर, रूपेश गायकवाड, महिला शिपाई सेजल दळवी यांचा समावेश होता. या छाप्यासाठी गोवा पोलिस महासंचालक वेदप्रकाश सूर्य यांचे मार्गदर्शन लाभले.

पत्र्याच्या मागे ‘खेळ चाले’ : या कारवाईचा पंचनामा पंच साक्षीदार, न्यायवैद्यक तज्ज्ञ व इंडियन ऑईल महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या जागेभोवती पत्रे उभारले आहेत. त्यामुळे आतील भागात काय चालले आहे, हे कोणाच्याही लक्षात येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गृहमंत्री अमित शहा घाबरले, संसदेत येण्याचे धैर्य त्यांच्यात नाही; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची टीका

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी; स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, सन्मानावर विशेष भर

Margao Dengue Cases: मडगावात डेंग्यूचा फैलाव! दहा दिवसांत 71 रुग्ण, 27 रुग्णांवर इस्पितळात उपचार

शौचालयात गेला असता काही मिनिटांत 'होत्याचे नव्हते', भिंत अंगावर कोसळून चिमुकल्याचा मृत्यू; नाणूसमधील दुर्घटना

संतापाची धार बोथट, बंडही शांत; भाजप मुख्यालयातील बैठकीनंतर फळदेसाई समर्थकांची नाराजी शमली

SCROLL FOR NEXT