Pm Narendra Modi  Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport : ‘दाबोळी’ विमानतळ सुरूच राहणार; मुख्‍यमंत्र्यांची मोदींसमक्ष गॅरंटी

Dabolim Airport : विरोधकांवर साधला निशाणा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांकवाळ येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्‍या जाहीर सभेत स्वागतपर भाषणात केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Dabolim Airport :

सांकवाळ, दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ असून तो कायम राहाणार आहे, तो बंद होणार नाही. विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका.

बॅंक लुटारू आणि राज्‍यघटनेचा अनादर करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांकवाळ येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्‍या जाहीर सभेत स्वागतपर भाषणात केले.

खलपांनी जनतेच्या कष्टाचे पैसे लुटले असून विरोधक सरड्यासारखे रंग बदलत आहेत. विरोधक अनावश्‍यक वक्तव्ये करतात, त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका. त्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवा. मोदी सरकार दिलेले आश्‍वासन पाळते, त्यानुसार चौफेर विकास सुरू आहे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

राज्यातील अटल सेतू, झुवारीवरील पूल याशिवाय इतर अनेक पूल पूर्ण केले आहेत. महामार्गाचेही उत्तम काम झाले आहे. याशिवाय इतर अनेक विकासकामे सुरू आहेत. महिला, गरीब, युवा, शेतकरी यांच्यासाठी अंत्‍योदय तत्त्‍वावर काम सुरू आहे. तळागाळातील जनतेपर्यंत योजना पोचविण्यात येत आहेत. विकासकामांत आणि जनकल्याणात कोठेही भेदभाव केला जात नाही. धर्मनिरपेक्ष हेतून विकास केला जातोय, असेही सावंत म्‍हणाले.

पंतप्रधानांकडून पल्लवींची विचारपूस

प्रचारसभेच्या व्यासपीठावर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांची विचारपूस केली. त्यांनीही मोदींशी संवाद साधला. काही क्षण त्यांनी चर्चा केली. भाषणादरम्‍यान पल्लवी धेंपे म्हणाल्या, विकसित भारतासाठी कार्यरत पंतप्रधान मोदी यांच्या कार्यापासून मी प्रेरणा घेऊन राजकारणात आले असून समाजसेवेसाठी कटिबद्ध आहे.

भाजपने मला उमेदवारी दिल्याबद्दल मी आभारी आहे. आरोग्य सेवा, महिला कल्याण, शिक्षण व युवकांसाठी मी कार्य करणार आहे. जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत सक्षमपणे पोचवणार आहे. म्‍हणूनच मला विजयी करा.

गरिबांना पक्की घरे देणार

लवकरच गरिबांना तीन कोटी पक्की घरे देण्यात येतील. ४ जूननंतर तिसऱ्या कार्यकाळात पक्के घर निश्‍चित मिळेल, ही मोदींची गॅरंटी आहे. ज्यांच्याकडे घर नाही, निराधार आहेत, त्याची माहिती द्या, त्यांचे अर्ज सादर करा. मध्यम वर्गसुद्धा भाड्याच्या घरात राहतो. त्यांच्या निवासासाठी आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.

स्वस्त गॅस सुविधा

सरकारने स्वस्त सिलिंडर घरोघरी पोचविला आहे. उज्ज्वला योजनेनुसार अनेकांपर्यंत ही सुविधा पोचली आहे. भविष्यात घरोघरी गॅस पाईपलाईन पोचणार आहे. त्यामुळे गृहिणींची उत्तम सोय होईल. सरकार या योजनांसाठी कटिबद्ध आहे, असेही मोदी म्हणाले.

मोफत उपचार

पाच लाखापर्यंत मोफत उपचार केले जातात. भविष्यात ज्येष्ठ नागरिक तसेच ७५ पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना आवश्‍यक त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. ८५ वर्षांचे नागरिक, तसेच दिव्यांगांची काळजी घेण्यासाठी दिल्लीत त्यांचा पुत्र मोदी आहे, असे ते म्‍हणाले.

मच्छीमारांचे कल्याण

यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने मच्छीमारांकडे दुर्लक्ष केले होते. पण भाजप सरकारने त्यांच्यासाठी खास मच्छीमार खाते सुरू केले. बोटीचे आधुनिकीकरण, किसान कार्ड, विमा सुरक्षा, उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांच्यासाठी विशेष योजना सुरू केल्या आहेत. भविष्यात त्यात अधिक भर पडेल, असे मोदी म्हणाले.

राज्यात आरोग्य सुविधा उत्तम आहेत. दक्षिण गोव्यात लवकरच ‘एम्स’ सुरू करण्यात येईल. तेथे विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. तसेच एसटी आरक्षणही लागू करण्यात येणार आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात प्रचंड गतीने विकास केला आहे. महिलाशक्ती, युवाशक्ती, किसानशक्ती, गरीब कल्याणासाठी विविध योजना आखल्‍यामुळे सक्षम भारतासाठी, विकसित भारतासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

इतिहास घडवा

मतदार व कार्यकर्त्यांनी मला पाच वेळा मला निवडून दिले. पक्षही मोठा झाला. आज ५० हजारांहून अधिक लोकांची सभेला उपस्थिती आहे, ही पक्षाची ताकद आहे. डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा चौफेर विकास झाला.

तेव्हा दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या. राज्यात अनेक पूल उभारले, महामार्ग बांधला, आरोग्य सुविधा तळागाळापर्यंत पोचविल्या. मोदी सरकारने गरीबांसाठी प्रचंड कार्य केले, असे खासदार श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT