वास्को: दाबोळी - चिखली राष्ट्रीय मार्गावर ‘रेड सिग्नल’ला थांबलेल्या एका दुचाकीला अचानक आग लागून संपूर्ण दुचाकी आगीत खाक झाली. सुदैवाने आग लागली तेव्हा दुचाकीस्वार बाजूच्या हॉटेलमध्ये पाणी आणण्यास गेल्याने तो या आगीच्या भडक्यात सापडला नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
चिखली पंचायतीच्या बाजूस असलेल्या राष्ट्रीय मार्गावर सकाळी ९- १५ वाजता सिग्नलवर लाल दिवा लागल्याने तिसवाडी - आगशी येथून आपल्या दुचाकीवरून (क्र. जीए ०७ -डी -३९२५) येणाऱ्या जेरमिनो फर्नांडिस यांनी आपली दुचाकी थांबवली.
तेव्हा अचानक त्याच्या दुचाकीला आग लागली. त्वरित आगीने आणखी पेट घेतल्याने दुचाकीस्वार जवळच हॉटेलमध्ये पाणी आणण्यासाठी गेला आणि आगीच्या भडक्यात सापडण्यापासून बचावला. त्याने नंतर हॉटेलमधून पाणी आणून दुचाकीवर मारले, पण आगीने आणखी पेट घेतल्याने संपूर्ण दुचाकी आगीत खाक झाली.
नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. दुचाकीला आग लागल्याची माहिती मिळताच वास्को पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या प्रकरणी अधिक तपास वास्को पोलिस स्थानकाचे हवालदार साईश आजगावकर करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.