Dabolim and Manohar International Airport CM Sawant Twitter
गोवा

मोपासह दाबोळी कार्यान्वित राहणार का? मंत्री सिंधिया, राजनाथ सिंग यांनी मुख्यमंत्री सावंताना दिली ग्वाही

राज्यातील दोन्ही विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील अशी ग्वाही सिंधिया यांनी मुख्यमंत्री सावंत यांना दिली आहे.

Pramod Yadav

Dabolim and Manohar International Airport: उत्तर गोव्यात नव्याने कार्यान्वित झालेल्या मनोहर विमानतळानंतर दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळ बंद होणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली.

राज्यातील दोन्ही विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील अशी ग्वाही सिंधिया यांनी मुख्यमंत्री सावंत यांना दिली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारमण, मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली.

यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह गेलेल्या या शिष्टमंडळाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह याची देखील भेट घेतली असून, राजनाथ यांनी देखील दाबोळी सुरूच राहिल याची खात्री दिली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्री सिंधिया यांच्याशी गोव्यातील विमान वाहतूक आणि पर्यटन क्षमता यावर त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी सिंधिया यांनी राज्यातील दाबोळी आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. अशी ग्वाही दिल्याची माहिती सावंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

SCROLL FOR NEXT