Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: "250 कोटी खर्च करून दाबोळी विमानतळ मॉडर्न करु"! मंत्री गुदिन्होंचा विश्वास; बंद न होण्याची दिली खात्री

Mauvin Godinho: सुमारे २५० कोटी खर्च करून दाबोळी विमानतळ एक मॉडर्न विमानतळ करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी येथे गुरुवारी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत दाबोळी विमानतळ बंद होईल याचा कोणी स्वप्नातही विचार करू नये. येणाऱ्या काळात दाबोळी विमानतळावर आणखी दोन एअर ब्रिजची सुविधा होणार आहे. तसेच सुमारे २५० कोटी खर्च करून दाबोळी विमानतळ एक मॉडर्न विमानतळ करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी येथे गुरुवारी सांगितले.

दाबोळी विमानतळावरील युनायटेड टॅक्सीमेन असोसिएशनाच्या नूतन कार्यकारिणीने मंत्री गुदिन्हो यांची नवे वाडे येथील कार्यालयात भेट घेतली. याप्रसंगी असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी मंत्री गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळ बंद होऊ नये यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल आभार मानले.

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी समस्यांसंबंधी चर्चा केली. गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळ बंद होणार नसल्याची ग्वाही दिली. या विमानतळासंबंधी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी सरक्षण मंत्री व नागरी विमान वाहतूक मंत्री यांच्या भेटी घेऊन पाठपुरावा करणार आहे.

त्यांनी आम्हाला काही मार्ग दाखविला आहे, त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका, असे आवाहन त्यांनी केले. येणाऱ्या काळात आम्ही दाबोळी विमानतळाचे रूप पालटणार आहोत. असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT