Bomb Threat At Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

Bomb Threat At Dabolim Airport: यापूर्वी देखील दाबोळी विमानतळावर बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती, मात्र तपासानंतर या धमक्या खोट्या असलल्याचे निष्पन्न झाले होते.

Pramod Yadav

Bomb Threat At Dabolim Airport

दाबोळी विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमकीचा ईमेल विमानतळ प्रशासनाला प्राप्त झाला आहे. धमकीच्या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, विमानतळ परिसरात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

विमानतळ संचालक एस व्ही टी राव यांनी पीटीआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ कार्यालयाला सोमवारी (दि.२९) सकाळी विमानतळावर बॉम्ब असल्याचा ईमेल प्राप्त झाला.

ईमेल प्राप्त झाल्यानंतर विमानतळावर सुरक्षा वाढविण्यात आली असून, सुरक्षेची सर्व काळजी घेतली जात आहे. दरम्यान, यामुळे विमान उड्डाण प्रभावित झाली नसल्याची माहिती राव यांनी दिली.

विमानतळ प्रशासनाच्या वतीने याबाबत दाबोळी पोलिस स्थानकात तक्रार दाखल दाखल केली असून, बॉम्ब निकामी पथक घटनास्थळावर दाखल झाले असून, आवश्यक तपासणी केली आहे.

सुरक्षेच्या निमित्ताने सर्व प्रकारची तपासणी आणि चौकशी केली जात असल्याचे, राव म्हणाले. धमकीचा ई-मेल कोठून प्राप्त झाला याबाबत माहिती घेतली जात असल्याची त्यांनी माहिती दिली.

दरम्यान, यापूर्वी देखील दाबोळी विमानतळावर बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT