Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ देशात तिसऱ्या स्थानी; भारतीय विमान प्राधिकरणचा सर्व्हे

वाराणसी विमानतळ पहिल्या तर इंदुर विमानतळ दुसऱ्या स्थानी

Akshay Nirmale

Dabolim Airport: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (AAI) तथा भारतीय विमान प्राधिकरणाने देशातील 13 विमानतळांचे सर्व्हेक्षण केले असून त्यातील सर्वोत्तम विमानतळ जाहीर केले आहेत.

भारतीय विमान प्राधिकरणाच्या या 13 विमानतळावर एसीआय-एएसक्यू (ACI_ASQ) सर्व्हेक्षण झाले. सन 2022 साठीचे हे सर्व्हेक्षण आहे. त्यानुसार गोव्यातील दाबोळी विमानतळ हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम विमानतळ ठरले आहे. दाबोळी विमानतळाला 5 पैकी 4.90 रेटिंग मिळाले आहे.

दरम्यान, देशात पहिल्या क्रमांकावर पुन्हा उत्तर प्रदेशातील वाराणसी विमानतळ आहे. वाराणसी विमानतळाला 5 पैकी 4.95 रेटिंग मिळाले आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे मध्यप्रदेशातील इंदुर हे विमानतळ. इंदुरला पाचपैकी 4.94 इतके रेटिंग मिळाले आहे.

जगातील विमानतळांची तुलना करता वाराणसीचे विमानतळ जगात 41 व्या स्थानी आहे. इंदूरच्या विमानतळाचे स्थान जगात 45 व्या क्रमांकावर असून गोव्याच्या दाबोळी विमानतळाचे स्थान जगात 51 व्या स्थानी आहे.

भारतीय विमान प्राधिकरणाच्या विमानतळाचे सरासरी रेटिंग जागतिक सरासरी रेटिंगपेक्षा अधिक आहे. विमानतळांचे जागतिक सरासरी रेटिंग 4.32 आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

SCROLL FOR NEXT