Dabolim Bike Rider accident Dainik Gomantak
गोवा

Dabolim Bike Rider accident: दुचाकीवर कोसळलं होर्डिंग, दुचाकीस्वार थोडक्यात वाचला; दाबोळीतील धक्कादायक घटना

Dabolim Hoarding Accident: दाबोळी विमानतळासमोरील चौपदरी महामार्गालगत असलेल्‍या जाहिरात फलकाचा (होर्डिंग) काही भाग तेथून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळला.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: दाबोळी विमानतळासमोरील चौपदरी महामार्गालगत असलेल्‍या जाहिरात फलकाचा (होर्डिंग) काही भाग तेथून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळला. सुदैवानेच दुचाकीस्वार ओंकार सावंत हा युवक बचावला. हेल्‍मेट असल्‍यामुळे त्‍याचा जीव वाचला, पण त्याच्या हातापायांना, खांद्याला किरकोळ दुखापत झाली. तसेच दुचाकीचे नुकसान झाले.

या धोकादायक फलकाबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी आवाज उठविला होता. फलकाचा पत्रा सुटून लोंबकळत असल्याचे निदर्शनास आणून देतानाच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली होती. काही प्रसारमाध्यमांनीही याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, योग्य ती उपाययोजना न झाल्याने आज मंगळवारी फलकाचा मोठा भाग कोसळला.

विशेष म्‍हणजे फलकाचा भाग कोसळत असल्याचे दुचाकीस्‍वार ओंकारच्‍या लक्षात आले; मात्र तरीही तो अपघात रोखू शकला नाही. फलक त्‍याच्‍यावरच कोसळला. अन्य एका दुचाकीस्वार वेळीच वेग वाढवून बाजूने निघून गेल्याने बचावला.

हेल्मेटमुळे वाचला ओंकार सावंतचा जीव

भला मोठा फलक दुचाकीवर कोसळूनही ओंकार सावंत हेल्मेटमुळे बचावला. अशा धोकादायक जाहिरात फलकांबाबत तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी आता जाेर धरू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT