Dabolim Airport Mig-29 tyre burst  Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर Mig-29 फायटर जेटचा टायर फुटला; 2 फ्लाईट्स डायव्हर्ट...

धावपट्टी लँडिंगसाठी दुपारी 3.30 पर्यंत बंद

Akshay Nirmale

Dabolim Airport Mig-29 tyre burst: दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर आज, मंगळवारी दुपारी मिग-29 या लढाऊ विमानाचा टायर फुटल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.

दरम्यान, या घटनेनंतर येथील काही फ्लाईट्स मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक कमर्शिअल फ्लाईट्सनाही याचा फटका बसला आहे.

तथापि, टायर फुटल्याने येथे आग लागली होती. पण त्या आगीवर तत्काळ विमानतळ प्रशासनाने नियंत्रण आणले. दरम्यान, या प्रकारानंतर दाबोळी विमानतळावरील धावपट्टी दुपारी 3.30 पर्यंत लँडिंगसाठी बंद करण्यात आली आहे. विमानतळ संचालक धनंजय राव यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, विमानतळाची धावपट्टी लँडिंगसाठी बंद असल्याने या विमानतळावर नियोजित असलेल्या दोन फ्लाईट्स इतरत्र वळवण्यात आल्या. दरम्यान, मिग फायटर जेटचा टायर नेमका कशामुळे फुटला, याचा शोध घेतला जात आहे.

भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'विमान नियमित उड्डाण करण्यापूर्वी टॅक्सीवेवर असताना त्याचा टायर फुटला. अग्निशमन दल आणि इतर सेवेचे जवान तातडीने तेथे पाठवण्यात आले. सिंगल पायलट विमान टॅक्सीवेपासून दूर नेले जाईल. दाबोळी विमानतळ हे INS हंस नौदल तळाचा भाग आहे. या सुविधेचा उपयोग नौदलाच्या विमानांद्वारे दिवसाच्या ठराविक वेळेत केला जातो.

या घटनेमुळे विमानतळाची धावपट्टी काही काळ बंद ठेवण्यात आली होते. तसेच यामुळे 10 विमानांच्या सेवेवर परिणाम झाला. काही उड्डाणे मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT