Free Water Dainik Gomantak
गोवा

वरिष्ठांशी बोलून पाण्यावरती तोडगा काढण्याचे दाबोळीकरांना आश्वासन: पैगिणकर

आपण आपल्या वरिष्ठांशी बोलून दोन दिवसात यावर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी सा. बां. पाणी विभागाचे अभियंते नरेश पैगिणकर यांनी दिले.

दैनिक गोमन्तक

वास्को : पाण्याचे अमाप बिल दाबोळी वासियांच्या माथी थापल्याने दाबोळी वासीयांनी सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाच्या बायणा येथील कार्यालयात जाऊन पाणी विभाग अभियंत्यांना घेराव घालून याविषयी जाब विचारला. आपण आपल्या वरिष्ठांशी बोलून दोन दिवसात यावर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी सा. बां. पाणी विभागाचे अभियंते नरेश पैगिणकर यांनी दिले.

मोफत पाण्याची अंबलबजावणी राहिली बाजूलाच. तर पाण्याचे बिल चक्क दोन हजार ते आठ हजार रुपये असल्याचे पाहून दाभोळी वासियांना पाण्याचा करंट बसला आहे. डोक्यावर हात मारण्याची पाळी दाबोळीवासिया वर आल्याने त्यांनी चक्क आज बायणा येथे सार्वजनिक बांधकाम पाणी विभाग गाठून अभियंत्यांना याविषयी जाब विचारली. नळाला पाणी येत नाही एका घागरी साठी रात्रपाळी तसेच नळाला घट्ट धरून बसावे लागते. तरीही पाणी व्यवस्थित मिळत नाही. तर मग पाण्याची वाढीव बिले कशी काय असा प्रश्‍न करून दाभोळ येथील नागरिकांनी अभियंत्याला बरेच धारेवर धरले.

सरकारने मोफत पाण्याची (Free Water) योजना जाहीर केली होती. ती हीच वाढीव बिलाची योजना काय? असा सवाल उपस्थित करून वाढीव बिल कसे आले ते सांगा. असाच प्रश्न वारंवार उपस्थित करून नागरिकांनी अभियंत्याला बरेच धारेवर धरले. शेवटी आपण याविषयी आपल्या वरिष्ठांशी बोलून यावर उपाययोजना काढणार असल्याचे सांगून आपणास त्यासाठी दोन दिवस द्या असे दाबोळी वासियांना अभियंत्याने सांगितले असता, आम्ही तुम्हाला पाच दिवस देतो. यावर आम्हाला उत्तर पाहिजे नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असाच पवित्रा या लोकांनी घेऊन नंतर अभियंत्याचे कार्यालय सोडले.

दरम्यान याविषयी मुरगाव (Margao) तालुक्यात अशी परिस्थिती असून दाबोळी (Dabolim) मतदार संघातील पंचायतीचे पंच सदस्य लक्ष्मण कवळेकर यांनी बोलताना, सांगितले की सरकारने मोफत पाण्याची योजना जाहीर केली. मात्र ती कागदावरच. उलट आम्हाला भरमसाट बिलाचा प्रसाद मिळत आहे. दोन हजार रुपयावरून बिलाची सुरुवात झाली आहे. तर काहींना आठ हजार रुपये बिल. लोकांनी पाणी नसताना एवढी मोठी बिलाची रक्कम भरावी कशी. गेली दोन वर्षे महामारी काळातून लोक दिवस काढत आहे. काहींना अन्नासाठी वणवण फिरावे लागते. आता पाण्याची बिले बघून लोकांची पायाखालची माती सरकली आहे. काय करावे अशाच विवंचनेत लोक पडलेले आहेत. तेव्हा या पाण्याच्या वाढीव बिलावर सरकारने ताबडतोब लक्ष घालून यातून सूट द्यावी अशी मागणी कवळेकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT