Kosambi thought festival Margao this year Dainik Gomantak
गोवा

D. D. Kosambi Thought Festival रद्द केल्यानंतर नाराजीचे वातावरण; ऑनलाईन विचार महोत्सवासाठी हालचाली

‘दक्षिणायन’ची बैठक : देवदत्त पटनायक 12 तारखेला सोशल मीडियावर लाईव्ह

दैनिक गोमन्तक

मडगाव: डी. डी. कोसंबी विचार महोत्सव रद्द केल्यानंतर बुद्धिजीवी वर्तुळात पूर्णतः नाराजीचे वातावरण आहे. या महोत्सवाच्या ऐवजी पर्यायी ऑनलाईन महोत्सव घेता येईल का? यावर मंथन सुरू आहे. तर पौराणिक साहित्यावर भाष्य करणारे तज्ज्ञ देवदत्त पटनायक यांनी आपण 12 नोव्हेंबरला सोशल मीडियावर लाईव्ह येणार, असे जाहीर केले आहे.

(D D After cancellation of Kosambi Vichar Mahotsav there complete displeasure in intellectual circles in goa)

कोसंबी महोत्सव रद्द करण्याच्या निर्णयावर सर्व व्याख्याते नाराज आहेत. हा एक प्रकारचा औचित्यभंग असल्याचा सूर व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी दक्षिणायन संस्थेच्या बैठकीत पर्यायी महोत्सव आयोजित करण्यावर चर्चा झाली. मात्र, आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नसल्याने ऑनलाईन महोत्सव करण्याबाबत सध्या विचार विनिमय सुरू आहे, असे क्लियोफात कुतिन्हो म्हणाले. हिंदू पौराणिक कथांवर भाष्य करणारे देवदत्त पटनायक हे ठरल्याप्रमाणे आपले व्याख्यान शनिवारी सायंकाळी 5 वाजता इन्स्टाग्राम व फेसबूकवर लाईव्ह सादर करणार आहेत.

... म्हणून व्याख्यात्यांचे वेळापत्रक बिघडले

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी हा महोत्सव रद्द झाल्याने व्याख्यात्यांचा व्यस्त वेळापत्रकाचा घोळ केला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘मला प्रतिष्ठेच्या टाटा लिटरेचर महोत्सवात मान्यवर म्हणून निमंत्रण होते. मात्र, ‘कोसंबी’साठी आपण ते स्वीकारले नाही. इतर काही व्याख्यातेही या महोत्सवात सहभागी होणार होते. पण त्यांचेही वेळापत्रक बिघडले’, अशी नाराजी मावजो यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Fraud: बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याचा प्रकार! खोर्जुवे येथील घटना, दोघांना अटक

Panjim: लाँड्रीला आग, 'नॅशनल' परिसरात खळबळ, अग्निशमन दलामुळे मोठी दुर्घटना टळली

Beef Smuggling: नावेलीत बेकायदा कत्तलखान्याचा पर्दाफाश, 700 किलो गोमांस जप्त! एकाला अटक

Goa Police: पोलिस दलात मनुष्यबळ कमी, उच्च न्यायालयाची स्वेच्छा दखल; जनहित याचिकेवर 7 रोजी सुनावणी

National Film Awards Winners List: 71 व्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'ट्वेल्थ फेल' सर्वोत्तम चित्रपट, 'नाळ-2'चाही यथोचित सन्मान

SCROLL FOR NEXT