Siolim Cylinder Blast Dainik Gomantak
गोवा

Siolim Cylinder Blast: शिवोलीत सिलिंडरचा स्फोट, भाडेकरु दाम्पत्य भाजले; उपचारासाठी जीएमसीत दाखल

Cylinder Blast Goa: दुलारी दाम्पत्याच्या घरात पाच लिटर क्षमतेचा छोटा सिलिंडर होता. दरम्यान, सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. यात दोघे गंभीर जखमी झाले.

Pramod Yadav

Siolim Cylinder Blast

म्हापसा: शिवोलीत सिलिंडरचा स्फोट होऊन दाम्पत्य जखमी झाले आहे. जखमी झालेल्या दाम्पत्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सडये येथील भाड्याच्या खोलीत सोमवारी (०९ डिसेंबर) हा स्फोट झाला.

राम दुलारी (31) आणि सुमन दुलारी (29) असे या स्फोटात जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तीन माड, सडये - शिवोली येथील एका भाड्याच्या खोलीत दोघे राहत होते. सोमवारी रात्री आठच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुर्घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुलारी दाम्पत्याच्या घरात पाच लिटर क्षमतेचा छोटा सिलिंडर होता. दरम्यान, सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. यात दोघे गंभीर जखमी झाले. जखमी दोघांना सुरुवातीला उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गॅस लीक झाल्याने स्फोट झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT