Cutting of Tree in Bicholim Dainik Gomantak
गोवा

डिचोलीतील धोकादायक झाड अखेर जमीनदोस्त

रस्त्यावरील झाडामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याने नागरिक झाले होते त्रस्त

दैनिक गोमन्तक

डिचोली : शहरातील न्यायालय इमारत परिसरात रहदारीच्या ठिकाणी धोकादायक अवस्थेत उभा असलेलं आंब्याचं झाड अखेर तोडण्यात आलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे हे झाड तोडण्यात आले आहे. झाड तोडल्याने नागरिकांसह पालकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मुख्य रस्ता आणि न्यायालयाकडून (Court) बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर न्यायालयाच्या कुंपणात उभे असलेले आंब्याचे झाड पूर्णपणे वाळलेले आणि अत्यंत कमकुवत बनले होते. हे झाड कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त होत होती. ज्याठिकाणी हे धोकादायक झाड उभे होते, तो परिसर सदैव रहदारीने (Traffic) गजबजलेला असतो.

सकाळी आणि दुपारी विद्यार्थी आणि पालकांची वर्दळ असते. रहदारीच्यावेळी जर हे झाड कोसळले, तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अशी भीती बाजारातील दुकानदार आणि अन्य नागरिक व्यक्त करीत होते. पालिका किंवा संबंधित यंत्रणेने संभाव्य धोका ओळखून हे झाड त्वरित कापावे, अशी मागणी डिचोलीतील (Bicholim) नागरिकांसह पालक खूप दिवसांपासून करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT