Cutbona Jetty|Fisherman-workers Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty: तीन हजार कामगारांसाठी १३ शौचालये उपलब्‍ध! जेटीवरील हलाखीची परिस्थिती

Cholera Cases: बाेटीवरच राहणे, जेवणे, आंघोळ करणे आणि नैसर्गिक विधीसुद्धा बोटींवरूनच करणे हे या कामगारांचे रोजचे जीवन बनले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: मोबोर आणि कुटबण या भागातील मच्‍छीमारी कामगारांमध्‍ये कॉलराच्‍या साथीने थैमान घातलेले असताना या कामगारांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांवर आता चर्चा होऊ लागली आहे. अत्‍यंत हलाखीच्‍या स्‍थितीत या कामगारांना बोटीवर ठेवले जाते. बाेटीवरच राहणे, बोटीवरच जेवणे, बोटीवरच आंघोळ करणे आणि नैसर्गिक विधीसुद्धा बोटींवरूनच उघड्या पाण्‍यात करणे, हे या कामगारांचे रोजचे जीवन बनले आहे.

कुटबण जेटीवर मच्‍छीमार ज्‍या पद्धतीने आयुष्‍य कंठत आहेत, ते पाहिल्‍यास कुणालाही धक्का बसेल, अशी प्रतिक्रिया या भागातील सामाजिक कार्यकर्ते अँथनी डिसिल्‍वा यांनी व्‍यक्‍त केली. या जेटीवर लहान-मोठे सुमारे २५० ते ३०० ट्रॉलर्स असून त्‍यावर तीन ते साडेतीन हजार कामगार काम करतात. या कामगारांसाठी जेटीवर फक्‍त १३ शौचालये उपलब्‍ध आहेत. अशा स्‍थितीत हे कामगार उघड्यावर शौच करणार नाहीत तर कुठे करणार, असा प्रश्‍न डिसिल्‍वा यांनी केला.

जे लहान ट्रॉलर्स आहेत, त्‍यावर शौचालयाची सोय नाही. अशा स्‍थितीत या कामगारांना नैसर्गिक विधी समुद्राच्‍या पाण्‍यातच करावे लागतात. कित्‍येकवेळा हे ट्रॉलर्स जेटीजवळ पोचलेले असतात. अशावेळी या कामगारांना शौच झाल्‍यास ते काठावरच विधी उरकतात. अशावेळी कुणीही कामगार कुठल्‍याही साथीमुळे बाधित झाल्‍यास ही साथ लगेच सगळीकडे पसरू शकते.

यासंबंधी डिसिल्‍वा यांना विचारले असता, जेटीवर जी शौचालये आहेत, ती इतकी अस्वच्छ आहेत की, कुठलाही माणूस या शौचालयात जाणे टाळेल. या कामगारांना आंघोळ वगैरे करण्‍यासाठीही जेटीवर सोय नसल्‍याने हा विधीही ते जेटीवर उघड्यावरच आटोपतात. या कामगारांना मनोरंजनाचीही सोय उपलब्‍ध नाही. त्‍यामुळे ते कोणत्‍या स्‍थितीत काम करतात याची कल्‍पना कुणालाही यावी, असे ते म्‍हणाले.

कुटबण जेटीवर १५० नवीन शौचालये बांधण्‍याचा प्रस्‍ताव २०१३ साली पुढे आणला होता. मात्र, ११ वर्षे उलटूनही ही शाैचालये उभी झालेली नाहीत. या जेटीवर तीन ते साडेतीन हजार कामगार काम करत असतानाही त्‍यांना वैद्यकीय सेवा देण्‍याची या जेटीवर अजिबात सोय नाही. त्‍यामुळे कुणीही आजारी पडले तर बाळ्‍ळी येथे किंवा चिंचोणे येथील आरोग्‍य केंद्रावर घेऊन जावे लागते. कित्‍येकवेळा हे अंतर दूर असल्‍यामुळे काही कामगार आजार अंगावरच काढतात. त्‍यामुळे कित्‍येकदा स्‍थिती हाताबाहेर जाते. सध्‍या कॉलराचा उद्रेक झालेला असतानाही या कामगारांना त्‍वरित वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठीही प्रयत्‍न झालेले नाहीत, ही कुटबणची वस्‍तुस्‍थिती आहे.

प्राथमिक आराेग्‍य केंद्राची गरज

वेळ्‍ळी गावात जेवढे लोक नाहीत, त्‍यापेक्षा जास्‍त कामगार कुटबण जेटीवर असून या कामगारांना वैद्यकीय सेवा त्‍वरित मिळण्‍यासाठी प्राथमिक आरोग्‍य केंद्र उभारण्‍याची गरज आहे. किमान दिवसातून दोन तास तरी सरकारी डॉक्‍टर कामगारांच्‍या आरोग्‍य तपासणीसाठी येथे उपलब्‍ध करावा, अशी मागणी होत आहे. शिवाय त्यांचा आरोग्‍य विमा उतरावा, अशीही मागणी वाढू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT