Cutbona Cholera  Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty: दिलासादायक! गोव्यातील या जेटीवरील कॉलरा साथ नियंत्रणात

Cutbona Mobor Cholera Cases: कुटबण आणि मोबोर या भागात कॉलेराची साथ फाेफावून सहाजण दगावले होते. तर २१८ मच्‍छीमार कामगारांना या साथीची लागण झाली होती. मात्र आता या दोन्‍ही जेटीवरील काॅलेराची स्‍थिती नियंत्रणात आली असून मागच्‍या पाच दिवसात एकही नवीन कॉलेराचा रुग्‍ण दाखल झालेला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Cutbona Mobor Jetty Cholera Cases

मडगाव: कुटबण आणि मोबोर या भागात कॉलेराची साथ फाेफावून सहाजण दगावले होते. तर २१८ मच्‍छीमार कामगारांना या साथीची लागण झाली होती. मात्र आता या दोन्‍ही जेटीवरील काॅलेराची स्‍थिती नियंत्रणात आली असून मागच्‍या पाच दिवसात एकही नवीन कॉलेराचा रुग्‍ण दाखल झालेला नाही. साथ निवारण विभागाचे प्रमुख डॉ. उत्‍कर्ष बेतोडकर यांनी ही माहिती दिली.

डॉ. बेतोडकर म्‍हणाले, दोन दिवसांपूर्वी एक कमी तीव्रतेची केस दिसून आली होती. हा अपवाद वगळता मागच्‍या तीन - चार दिवसांत अतिसाराने त्रस्‍त झालेला एकही रुग्‍ण दाखल झालेला नाही. असे जरी असले तरी मागचे दोन आठवडे आम्‍ही कुटबण व मोबोर या जेटीवरील स्‍थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्‍याशिवाय मालीम जेटीवरही कॉलरासाथीसंबंधी आमची पहाणी चालू आहे, असे त्‍यांनी सांगितले.

ही काॅलराची साथ फक्‍त जेटीपुरतीच मर्यादित होती. कुटबण आणि मोबोर या दोन्‍ही ठिकाणी या साथीचा अधिक उद्रेक झाल्‍याने सुरुवातीला सहाजण दगावले होते तर २१८ जण या साथीने बाधित झाले होते. हे सहाही मृत्‍यू काॅलरामुळे झाल्‍याचे आरोग्‍य खात्‍याने मान्‍य केले होते.

कुटबण जेटीवरील परिस्‍थिती पूर्णत: सुधारलेली असून या जेटीवर जी नवीन शौचालये उभारण्‍यात आली आहेत. त्‍यामुळे साफसफाईचा मुद्दा आता अस्‍तित्‍वात राहिला नाही. या भागातील कॉलराची स्‍थिती झपाट्याने नियंत्रणात आलेली आहे.
आलेक्‍स सिक्‍वेरा, पर्यावरण मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT