Cutbona Jetty Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty: कुटबण जेटीवरील 3 डिंगी बोटी जप्‍त! मच्छीमार खात्याची कारवाई; अवैधरीत्या पार्क केल्याने दणका

Cutbona jetty boats seized: कुटबण जेटीवर अवैधरीत्या पार्क करून ठेवलेल्‍या डिंगी बोटी सात दिवसांत हटवाव्‍यात अशी मच्‍छीमार खात्‍याने नोटीस बजावूनही त्‍या न हटविल्‍याने मंगळवारी या तीनही बोटी जप्‍त करण्‍यात आल्‍या.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: कुटबण जेटीवर अवैधरीत्या पार्क करून ठेवलेल्‍या डिंगी बोटी सात दिवसांत हटवाव्‍यात अशी मच्‍छीमार खात्‍याने नोटीस बजावूनही त्‍या न हटविल्‍याने मंगळवारी या तीनही बोटी जप्‍त करण्‍यात आल्‍या.

या बोटी सध्‍या मच्‍छीमार खात्‍याच्‍या कार्यालयाकडे ठेवण्‍यात आल्‍या आहेत. वाहतुकीला अडचणीच्‍या ठरणाऱ्या अन्‍य बोटींही लवकर हलवाव्‍यात, अन्यथा त्‍याही जप्‍त केल्‍या जातील, असा इशारा देण्‍यात आला आहे.

मच्‍छीमार खात्‍याच्‍या दक्षिण गोव्‍याच्‍या अधीक्षक वर्षा नाईक देसाई यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे ११ नोव्‍हेंबर रोजी मच्‍छीमार खात्‍याने सात दिवसांच्‍या आत या बोटी हलवण्यात याव्‍यात अशी नोटीस जारी केली होती. ही मुदत संपल्‍याने कारवाई सुरू केली आहे, असे सांगितले.

ज्‍या डिंगी बोटी जप्‍त करण्‍यात आले आहेत त्‍याचे मालक कोण ते सापडत नाहीत आणि त्‍यांचे नोंदणी क्रमांकही नाहीत, असे देसाई यांनी सांगितले. दरम्‍यान, मच्‍छीमार खात्‍याच्‍या नोटिसीचा आदर करून बोटींच्‍या वाहतुकीला अडचणीच्‍या ठरणाऱ्या या डिंगी बोटी बोट मालकांनी स्वतःहून हलवाव्‍यात आणि मच्‍छीमार खात्‍याला सहकार्य करावे, असे मच्‍छीमार संघटनेचे अध्‍यक्ष सावियो डिसिल्‍वा यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT