Gold Price Dainik Gomantak
गोवा

Akshaya Tritiya 2023 : सराफी पेढ्यांवर उशिरापर्यंत ग्राहकांची वर्दळ; उत्साह कायम

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीकडे दिसून आला कल

दैनिक गोमन्तक डिजिटल

राजधानीतील सराफी पेढ्यांवर शनिवारी रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी दिसून आले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्णालंकारांच्या दुकानांतून लोकांचा खरेदीसाठी उत्साह पहायला मिळाला.

मे महिन्यामध्ये विवाहाचे मुहूर्त आहेत, त्यामुळे विवाहासाठी किंवा मुहूर्त साधण्यासाठीचे दागिने खरेदी करण्यासाठी शहरातील नामांकित सराफी पेढ्यांवर ग्राहकांची गर्दी होती. शुक्रवारच्या तुलनेत २४ कॅरेटच्या सोन्याच्या भावामध्ये शनिवारी तोळ्यामागे (दहा ग्रॅम) २१६ रुपयांची उतरण झाली होती. म्हणजेच ६०,०६६ वरून तो दर ५९,८५० असा राहिला.

त्याशिवाय २२ कॅरेटच्या सोन्यामध्येही २०० रुपयांची तूट दिसून आल्याने ते ५७ हजार२०० वरुन ५७ हजार रुपये प्रति तोळा असे घसरलेले दिसले.स्थानिक सोनारांच्या पेढ्यांवर आणि नामांकित पेढ्यांवरही रात्री उशिरापर्यंत लोक सोने खरेदी करीत असतानाचे चित्र होते.

साडेतीन मुहूर्ताला सवलत

साडेतीन मुहूर्ताला सोने खरेदीचा एक परंपरा मानली जाते, आता गोव्यातही लोक ती परंपरा जोपासत आहेत. शिवाय नामांकित सराफी व्यवसाय करणाऱ्या पेढ्यांवर आकर्षक सूट, सवलत, योजना या मुहूर्तामुळे दिसून आल्या. त्यामुळे सोने खरेदी करणारा ग्राहकही अशा सवलतीचा किंवा योजनेची वाट पाहत असतात, हे काही लपून राहत नाही.

याशिवाय वाहन खरेदीसाठीही अनेकांनी आजचा मुहूर्त साधला. त्याशिवाय बांधकाम व्यावसायिकांमध्ये नव्या फ्लॅट बुकिंग किंवा वास्तू प्रवेशासारखे कार्यक्रमही या मुहूर्ताला साधण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT