Goa Curti Theft Dainik Gomantak
गोवा

Curti Theft: चोरट्यांचे आव्हान कायम! कुर्टीत फ्लॅट फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास

Curti Theft News: चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केली. बंद फ्लॅटची कडी तोडून आत प्रवेश केला व आतील कपाट फोडून रोख पंधरा हजार रुपये तसेच काही दागिने मिळून एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Curti Flat Theft News

फोंडा: कुर्टी येथे चोरट्यांनी फ्लॅट फोडून रोख रकमेसह दागिने मिळून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही चोरी रविवारी रात्री झाली. येथील नागा मशीद भागात फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नसीम बानो यांच्या घरी ही चोरी झाली.

रविवारी नसीम या आपल्या नातेवाइकांकडे गेल्या होत्या, तर वृद्ध पती शेजारील मशिदीत झोपायला गेला होता. सकाळी नसिम या घरी परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केली. बंद फ्लॅटची कडी तोडून आत प्रवेश केला व आतील कपाट फोडून रोख पंधरा हजार रुपये तसेच काही दागिने मिळून एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी फोंडा पोलिसांनी मंदिर व घरफोड्या करणाऱ्या पाचजणांना पकडल्यानंतर ही चोरी करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान कायम आहे. पोलिसांनी या चोरी प्रकरणी पंचनामा केला. पुढील चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT