Curfew in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Curfew: संचारबंदीत वाढ, मात्र धार्मिक स्थळे व क्रीडा संकुले खुली

उद्यापासून राज्यातील धार्मिक स्थळे, जीम व क्रीडा संकुले मर्यादीत स्वरूपात सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात सुरू असलेली संचारबंदी आज म्हणजेच 12 जुलै रोजी संपणार होती मात्र ही संचारबंदी 19 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यातील धार्मिक स्थळे, जीम व क्रीडा संकुले काही नियमांचे पालन करून खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावर दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत आज अधिसूचना काढली आहे.

उद्यापासून राज्यातील धार्मिक स्थळे, जीम व क्रीडा संकुले मर्यादीत स्वरूपात सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आज काढलेल्या अधिसूचनेनुसार 19 जुलै रोजी सकळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. यापूर्वी ज्या सवलती व सूट देण्यात आल्या आहेत त्या कायम राहतील. दुकानांना यापूर्वी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ होती, ती आता संध्याकाळी 7 पर्यंत केली आहे. त्यासोबत 50 टक्के उपस्थितीनुसार जीम उघडता येतील. क्रीडा संकुले फक्त खेळाडूंसाठी प्रेक्षक न घेता खुली करता येतील. धार्मिक स्थळांत 15 जणांना प्रवेश देता येईल. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने 50 टक्के क्षमतेने किंवा 100 लोक घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून नव्या संचारबंदीचे नियम लागू होतील. दरम्यान, आठवडी बाजार, कसिनो, जलतरण यांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.

राज्यात आतापर्यंत 13,402 जणांना लस

राज्यात आज 13,402 जणांचे लसीकरण झाले.7,687 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस, तर 5,715 जणांनी दुसरा डोस घेतला. आत्तापर्यंत राज्यात 10,81,418एवढे लसीकरण झाले असून 9,11,805 जणांनी पहिला डोस, तर 1,69,613 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

दोघांचा मृत्यू

काल दिवसभरात 4,197कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. जाहीर झालेल्या अहवालानुसार आज 131 नवे कोरोनाबाधित सापडले, तर 241 कोरोनाबाधित बरे झाले. आज 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 3,097 वर पोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT