Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कुडचडेतील ‘जीम ट्रेनर’ फरार! पोलिसांचा दावा; अपहरण, लैंगिक अत्याचार, विनयभंगाचा गुन्हा नोंद

curchorem Gym Owner: दरम्‍यान, दक्षिण गोव्‍याच्‍या प्रधान सत्र न्‍यायाधीश शेरीन पॉल यांनी संशयिताला एक दिवसाचा अंतरिम जामीन मंजूर करताना उद्यापर्यंत त्‍याला अटक करू नये, अशा सूचना पाेलिसांना केल्‍या आहेत.

Sameer Panditrao

मडगाव: कुडचडे येथील एका युवतीवर बोगमाळो-वास्‍को येथे नेऊन बलात्‍कार करण्‍याचा आरोप असलेल्‍या कुडचडेच्‍या हायड्रा फिटनेस या आस्‍थापनाचा मालक सरवर खान याच्‍याविराेधात वास्‍को पाेलिसांनी बलात्‍काराच्‍या आरोपाव्‍यतिरिक्‍त अपहरण आणि विनयभंगाचाही गुन्‍हा नोंद केला आहे. आपल्‍याला अटक होईल या भीतीने तो फरार झाल्‍याचा दावा वास्‍को पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणात अटक होईल या भीतीने संशयिताने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून उद्या शुक्रवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्‍यान, दक्षिण गोव्‍याच्‍या प्रधान सत्र न्‍यायाधीश शेरीन पॉल यांनी संशयिताला एक दिवसाचा अंतरिम जामीन मंजूर करताना उद्यापर्यंत त्‍याला अटक करू नये, अशा सूचना पाेलिसांना केल्‍या आहेत.

सुरुवातीला त्‍या युवतीने कुडचडे पोलिांतस तक्रार दिली होती.संशयित खान याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताना आपल्‍यावर खोटा आरोप करून आपल्‍याला या प्रकरणात गुंतविण्‍यात आले आहे, असा दावा केला होता.

मात्र, परिस्‍थितीजन्‍य पुरावे पाहिल्‍यास हा दावा खोटा असून संशयिताला जामीनमुक्‍त केल्‍यास तो अन्‍य साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, असे पोलिसांनी आपल्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT