पणजी: कुंकळ्ळीवासीय आधीच एका फिशमिलमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. त्यातच नवी फिशमिल स्थापन करण्याचा घाट घातला जात आहे. कुंकळ्ळीवासीय आधीच प्रदूषणकारी फिशमिल प्रकल्पामुळे त्रस्त आहेत, त्यामुळे आणखी फिशमिल कुंकळ्ळीत नको, अशी मागणी माजी सनदी अधिकारी तथा कॉंग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना पत्र पाठवून केली आहे.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत आणखी एक फिश मिल प्लांट स्थापन करण्याचे प्रयत्न होत आहेत, त्यामुळे कुंकळ्ळीतील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कुंकळ्ळीतील स्थानिक रहिवाशी असल्याने, मला आश्चर्य वाटते की, सर्व ठिकाणच्या फिश मिल प्लांट्सना कुंकळ्ळीतच गुंतवणूक करण्याचे आकर्षण कसे काय आहे. अगदीच आवश्यक असल्यास फिशमिल प्रकल्प अन्यत्र न्या, पण कुंकळ्ळीत नको, अशी विनंतीही गोम्स यांनी केली आहे.
लोकांना आरोग्याच्या तक्रारी
सध्या अस्तित्वात असलेल्या फिश मिल प्लांटमुळे होणाऱ्या जल आणि वायू प्रदूषणाला प्रशासन कसे हाताळते, हे मला माहीत नाही. केवळ कारखान्याच्याच ठिकाणी नव्हे, तर सडलेल्या माशांच्या कचऱ्याने भरलेले ट्रक जाणारे रस्ते अन् परिसर दुर्गंधी अन् प्रदूषणाने व्यापला जातो. हे सर्व सामान्य माणसाच्या सहनशक्तीच्या पलिकडे आहे.
सरळ सांगायचे तर, ते रहिवाशांच्या फुफ्फुसांना अशा दूषित हवेने गुदमरायला होते. दुर्गंधीयुक्त ट्रक दृष्टीआड झाल्यानंतरही त्याचा प्रभाव दीर्घकाळापर्यंत राहतो.
पुनरावलोकन व्हावे! फिशमिलसम अन्य प्लांटला तत्त्वत: मान्यता मिळाल्यास, त्याचे पुनरावलोकन होणे आवश्यक आहे. पर्यावरण विभाग,प्रदूषण नियंत्रण मंडळ, डीएमना केंद्रीय कायद्यांतर्गत स्वतंत्रपणे कार्य करणे आवश्यक असले तरी, त्यांना व सरकारला ज्ञात कारणांमुळे तेही शक्तीहीन झाले आहेत,असे गोम्स यांनी पत्रात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.