cuncolim constituency Clafasio Dias Dainik Gomantak
गोवा

कुंकळ्ळी सिटीझन्स फोरमचा क्लाफासियो डायस यांना पाठिंबा

..त्यामुळे सर्व कॉंग्रेस कार्यकर्ते दुखावले गेले आहेत

दैनिक गोमन्तक

सासष्टी : कुंकळ्ळीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार क्लाफासियो डायस यांना कुंकळ्ळी सिटीझन्स फोरमने आपला पुर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. कुंकळ्ळीत जरी दहा उमेदवार निवडणूक लढवीत असले तरी कॉंग्रसमधून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेले क्लाफासियोच निवडून येतील. नगरपालिका क्षेत्रात 5 व पंचायत क्षेत्रात 5 हजार मते त्यांना मिळतील असे भाकीत फोरमचे अध्यक्ष मारियो मोीराईश यांनी केले आहे.

क्लाफासियो डायस यांची ही शेवटची निवडणून. या नंतर ते निवडणुक (Election) लढवणार नसल्याचे त्यानेच तसे सांगितल्याचे मोराईश यांनी सांगितले.

आम्ही पक्ष नव्हे तर व्यक्तीचे विकास काम पाहुन यांना पाठिंबा देत आहोत. पहिल्या अडीच वर्षांत जेव्हा ते कॉंग्रेस (Congress) पक्षात होते तेव्हा त्यांच्याकडून विकास कामे झाली नाहीत. म्हणून यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व कोविडचे एक वर्ष सोडले तर बाकी केवळ दीड वर्षांत यांनी प्रंचड विकास कामे केली आहेत. त्याने 16 वीज ट्रान्झफॉर्मर्स बसवले शिवाय 10 कोटी रुपयांची पाण्याचे पाईपलाईन घातली. 25 कोटी रुपय खर्च करुन रस्ते गुळगुळीत केले. तसेच आरोग्य केंद्र, अग्नीशमक केंद्र, वाचनालय सुरु केले असे मोराईश यांनी सांगितले.

कॉंग्रेसतर्फे कुंकळ्ळीतील तीन उमेदवार इच्छुक होते. मात्र सर्वांना डावलून बाणावलीच्या युरी आलेमावाला कॉंग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे सर्व कॉंग्रेस कार्यकर्ते दुखावले गेले आहेत असेही मोराईश यांनी सांगितले.

कुंकळ्ळी औद्योगीत वसाहतीत 6 ते 8 स्टील फॅक्टऱ्या बंद करायला हव्यात. या कंपन्यामुळे प्रदुषण वाढले असून लोकांना कर्क रोगा सारख्या रोगाचा त्रास जाणवू लागला आहे. त्यासाठी नगराध्यक्षांच्या प्रमुखपणाखाली तीव्र आंदोलनाची गरज असल्याचे मोराईश याने सांगितले.

सर्व युवा शक्ती क्लाफासियोच्या पाठीशी आहेत असे युवा नेते सनरुप नाईक, अमिन नरसारजंग, आलफ्राज शेख यानी सांगितले. कुंकळ्ळीत युवकांमध्ये बेरोजगारी आहे व क्लाफासियोने स्वयं रोजगार लक्षात घेऊन युवकांसाठी उद्योग धंदा सुरु करण्यासाठी सर्व तऱ्हेचे सहकार्य करण्याचा शब्द दिव्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT