Cunchelim Road Dainik Gomantak
गोवा

Cunchelim Road : कुचेली-करासवाडा रस्त्याची दुर्दशा; खड्ड्यांकडे ‘सांबाखा’चे दुर्लक्ष

Mapusa Corporation : हा मार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागाकडून म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी करून घेणे आवश्यक असूनही तो केला जात नाही,अशी खंत स्थानिक नगरसेवक आनंद भाईडकर यांनी व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

बार्देश, म्हापसा पालिका क्षेत्रातील प्रभाग एकमधील कुचेली ते करासवाडा या मुख्य रस्त्यावर गुडघ्याएवढे खड्डे, कंबरभर पाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ता विभाग करते काय, असा संतापजनक सवाल नगरसेवक आनंद भाईडकर यांनी केला आहे.

या कुचेली करासवाडा मार्गावरून अहोरात्र हजारो लहान मोठी वाहने ये जा करतात. त्यामुळे या पावसाच्या दिवसात पडत असलेले पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचून राहते आणि त्या ठिकाणाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

हा मार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागाकडून म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी करून घेणे आवश्यक असूनही तो केला जात नाही,अशी खंत स्थानिक नगरसेवक आनंद भाईडकर यांनी व्यक्त केली.

कुचेली ते करासवाडा हा रस्ता सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतराचा आहे. दरवर्षी हे खड्डे असेच पडत असतात परंतु संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभाग याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे पावसाच्या दिवसांमध्ये या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते व या खड्ड्यांमध्ये वाहने जाऊन आपटतात.

वाहन चालक व सहप्रवाशांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो तर अनेक दुचाकी चालक या खड्ड्यांमध्ये पडून त्यांना दुखापती झाल्या आहेत. यात महिला व मुलींचा जास्त समावेश आहे. वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोडही झालेली आहे.

सध्या पाऊस पडत आहे. त्यामुळे डांबरीकरण करणे शक्य नाही. पुढच्या आठवड्यापासून आम्ही या ठिकाणी पेव्हर्स टाकून तात्पुरती डागडूजी करणार आहे. आणि हे पाणी साठण्या मागचं कारण म्हणजे ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटाराची व्यवस्था नाही. तीही करणे गरजेचे आहे.

-महेश शेट्टी, अभियंते साबांखा

आपण दरवर्षी या ठिकाणी आपल्या परीने हे खड्डे बुजवण्याचे काम करीत आहे.परंतु हे आपल्या प्रभागाला येत असलेला रस्ता असला तरी तो सार्वजनिक बांधकाम विभाग अधिपत्याखाली येतो. तो दुरुस्ती करण्यासाठी स्थानिक आमदाराने सार्वजनिक बांधकाम खात्याला सांगणे जरुरीचे आहे.

परंतु आमदार याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास होतो. आम्हीच जर नगरसेवकांनी अशी सार्वजनिक बांधकाम खात्याची कामे करायला लागलो तर आमदाराने कोणते काम करावे.

-आनंद भाईडकर, नगरसेवक

या मार्गावरून जी वाहने जातात ती पाहून आम्हाला धक्का बसतो. आपल्या पुढ्यातच अनेक दुचाकी खड्ड्यात पडलेल्या आहेत. तर अनेकजण पत्नी व मुलांसहित रस्त्यावर पडून त्यांना दुखापती झाल्या आहेत. याकडे संबंधित नगरसेवक किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

-संतोष रायकर, रहिवाशी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT