Sangod Utsav  Dainik Gomantak
गोवा

Sangodd Festival 2024: देवते पाव गे! गणपती विसर्जनाच्या दिवशी रंगणाऱ्या 'सांगोडोत्सव'विषयी माहितीये का?

Sangod Utsav 2024: श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिराच्या श्रींच्या विसर्जनानिमित्त सांगोडोत्सवानिमित्त पारंपरिक चित्ररथ स्पर्धा आयोजित केल्या जातात

गोमन्तक डिजिटल टीम

Sangodd Festival 2024 Goa

माशेल येथील श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिरातर्फे साजरा होणारा पारंपरिक उत्सव म्हणजे सांगोडोत्सव. या सांगोड उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे.

कुंभारजुवे गावातील परंपरागत सात दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या वेळी केला जाणारा शांतादुर्गा कुंभाराजुवेकरीणीचा सांगोडोत्सव गोमंतकामध्ये प्रसिद्ध आहे. कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा व गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध चित्ररथ करून त्याद्वारे गोमंतकीयांना निरनिराळे संदेश देणारे चित्ररथ मांडवी नदीचे पात्र व्यापून टाकतात. या सांगोडोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे.

कुंभारजुवे गावातील एका ग्रामस्थाने काही कारणास्तव आपल्या घरातील गणेशमूर्ती माशेल येथील मंदिरात आणून ठेवली. त्यावेळेपासून दरवर्षी श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीणीच्या मंदिरात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजेला लावतात व सातव्या दिवशी त्याचे मोठ्या उत्साहाने विसर्जन करतात. सनई - चौघड्याच्या मंजूळ वादनाने श्री गणेशाची मूर्ती माशेल तारीवाड्यावर पोहोचल्यानंतर पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या सांगोडात ठेवतात.

‘देवते पाव गे’, ''श्री शांतादुर्गा माता की जय’ अशा जयघोषाने देवतेच्या सांगोडोत्सवाला सुरुवात होते. सांगोडावर रिद्धी, सिद्धी, शंकासूर, वेताळ अशी सोंगे घेतलेले ग्रामस्थ असतात. सांगोडात बसवून श्रींची मिरवणूक काढली जाते. (Shantadurga kumbharjuvekarin Ganesh Visarjan)

या सांगोडा समवेत इतरही चित्ररथांचे सांगोड श्रींच्या मिरवणुकीत सहभागी होतात. गावातील सात दिवसाच्या गणेशमूर्तीसुद्धा विसर्जनासाठी इथे आणल्या जातात. श्री शांतादुर्गा कुभांरजुवेकरीण मंदिरातील श्रींच्या विसर्जनाप्रीत्यर्थ सांगोड उत्सवाच्यावेळी पारंपरिक चित्ररथ स्पर्धाचे आयोजन केलेले असते. अशा प्रकारे विसर्जन सोहळ्यातही पारंपरिकता आढळून येत असल्याने, गोमंतकीयांमध्ये गणेश विसर्जनाला सुद्धा किती महत्त्वाचे स्थान आहे, हे दिसून येते.

या सांगोडा समवेत इतरही चित्ररथाचे सांगोड श्रींच्या मिरवणुकीत सहभागी होतात. इतर सात दिवसांची गणेश मूर्ती पण विसर्जनासाठी नेतात. श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिराच्या श्रींच्या विसर्जनानिमित्त सांगोडोत्सवानिमित्त पारंपरिक चित्ररथ स्पर्धा आयोजित केल्या जातात. हे चित्ररथ देखील गावातील तरुण मंडळी करीत असल्याने त्यांच्या कलेला वाव मिळतो.

आपला चित्ररथ आकर्षक कसा होईल याकडे प्रत्येकाचा कल असतो. या उत्सवामुळे नव कलाकार निर्मितीस हातभार लागतो. श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण पारंपरिक सांगडोत्सव सर्व गोमंतकामध्ये प्रसिद्ध असल्याने भक्तजनांची, कलाकारांची तसेच पाहणाऱ्यांची दोन्हीच्या दोन्ही बाजूला अलोट गर्दी असते. कुंभारजुवे पुलावरही भाविकांची मोठी गर्दी होते, अलीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचायतीतर्फे हा उत्सव साजरा केला जातो. सांगोडोत्सवात विजयी चित्ररथांना आकर्षक पारितोषिकेही दिली जातात.

संजय घुग्रेटकर

उत्सवाची सुरूवात

संध्याकाळी सनई - चौघड्याच्या मंजूळ वादनाने श्री गणेशाची मूर्ती माशेल तारीवाड्यावर पोहोचल्यानंतर पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या सांगोडात ठेवतात. ‘देवते पाव गे’, ''श्री शांतादुर्गा माता की जय’ अशा जयघोषाने देवतेच्या सांगोडोत्सवाला सुरुवात होते. नदीपात्रात पारंपरिक सांगोडातील चित्ररथ फिरवले जातात. माशेल-तारीवाडा, कुंभारजुवे नदीपात्रात हे चित्ररथ फिरतात. जवळच्या पुलापर्यंत जातात आणि तेथून पुन्हा मागे फिरतात. नदी किनाऱ्यावरून हा सांगोडोत्सव हजारोंच्या संख्येने भाविक पाहतात.

पारंपरिक ‘सांगोड’ म्हणजे काय?

सांगोड म्हणजे दोन होड्या किंवा नावा एकत्र बांधून केलेले जलयान. कुंभारजुवेत नदीत दोन होड्या एकत्र बांधून त्यावर आकर्षक चित्ररथ साकारला जातो. गणेशमूर्तीसह कलाकार मंडळी पारंपरिक वेशभूषेत आपली कला सादर करतात. तसेच काही चित्ररथांतून सामाजिक, पर्यावरणीय संदेशही देतात. शेकडो वर्षांची पारंपरिकचा जपत कला सादर केली जाते, हे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारचा उत्सव पर्यटकांनीही आकर्षिकत करीत आहे. त्यामुळे पर्यटकांचीही उपस्थिती या ठिकाणी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

SCROLL FOR NEXT