Sea Shore
Sea Shore  Dainik Gomantak
गोवा

Morjim: मांद्रे, मोरजीत ‘सीआरझेड’ धाब्यावर!

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: केंद्र सरकारने समुद्र आणि नद्यांच्या किनाऱ्याना संरक्षण मिळावे त्यासाठी सीआरझेड कायदा १९९१ (CRZ Act 1991) साली केला. मात्र, हा कायदा धाब्यावर बसवून वाळूच्या टेकड्यांचे सपाटीकरण करून शॅक्ससह अन्य व्यवसाय उभारले जात आहेत. परिणामी मांद्रे मतदारसंघातील मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल व केरी तेरेखोल किनारी भागातील मोठ्या प्रमाणात किनारे खचू लागले आहेत. हे किनारे वाचवण्याची गरज आहे. १७ कोटी रुपये खर्चून केरी किनारी बांधलेली संरक्षक भिंत खचत आहे.

दरम्यान, मांद्रे मतदार संघातील समुद्रकिनारे व त्या त्या परिसरातील किनाऱ्यांचे भाग खचताना दिसत आहे. त्याचा स्थानिक व्यावसायिक व लोकवस्तीला भविष्यात मोठा धोका संभवतो. मोरजी, आश्‍वे, मांद्रे,हरमल व केरी तेरेखोल या चार पंचायत क्षेत्रातील किनाऱ्यांचे पर्यटकांना आकर्षण आहे. किनाऱ्यांचे सौंदर्य, नारळीच्या बागा, फेसाळणारा समुद्र , पक्षांचा किलबिलाट , हिरवीगार वनराई , शेतजमिनी, डोंगर, माळराने, नवनवी पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करतात.

इथला समुद्र शांत, कधीही रौद्ररूप न घेणारा , मात्र पावसाळ्यात भरतीवेळी किनाऱ्याची धूप करीत असला तरी तो , सर्वाना हवाहवासा वाटतो. आता हेच समुद्र किनारे ढासळू व खचू लागले आहेत.

किनाऱ्यावर मारवेल पावसाळ्यात पसरते. त्यामुळे किनारा हिरवागार वाटतो. ही मारवेल किनाऱ्यावरील वाळूला मुळांनी घट्ट पकडून ठेवते. किनाऱ्याची झीज ही वाळू रोखून धरते. प्रत्येक पर्यटन हंगामात याही ‘मारवेल’वर संकट ओढवते.

स्थानिकांचा उपक्रम : केरी तेरेखोल येथील सुरूचे बन किनाऱ्यांची शान आहे. अनेक झाडे सागरात जलसमाधी घेतात. त्यामुळे नवी झाडे लावण्यासाठी नाट्यकलाकार संजना, हेमंत तळकर यांच्यासह नंदकिशोर, सोनू , विठ्ठल, दामोदर तसेच सर्वेश तळकर यांनी पुढाकार घेतला आहे.

प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आमदारपदाच्या काळात नाबार्ड निधीतून ६.७६ कोटी रुपये खर्च करून १६२० मीटर लांबीची केरी फेरीबोट धक्का ते आजोबा मंदिर पर्यंत संरक्षण भिंतीचे बांधकाम केले. मात्र, त्यानंतर आजवर १७ कोटी रुपये या भिंतीवर खर्च झाले. पुन्हा या भिंतीवर पाच कोटींचा खर्च होणार आहे, अशी माहिती आमदार दयानंद सोपटे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cashew Fest Goa 2024: ध्वनी भानुशालीचे सादरीकरण, डिजे हर्षा; काजू महोत्सवाच्या पहिल्या दिवासाची झलक Video

Panaji News : वितरणातील त्रुटींमुळेच पाणीटंचाईचे संकट; मुख्य अभियंता प्रमोद बदामी

Congo Violence: काँगोमध्ये हिंसाचार सुरुच! विस्थापितांच्या छावणीवर बॉम्बहल्ला; 35 जणांचा मृत्यू

Margao News : उल्‍हास वेर्लेकर कुटुंबीयांकडून विविध संस्‍थांना १० लाखांची देणगी; लग्नाच्या वाढदिनी भेट

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT