Crypto Investment Fraudv Dainik Gomantak
गोवा

Crypto Currency: क्रिप्टोमधील गुंतवणूक भोवली!! गुंतवणूकदाराची 2 कोटींची फसवणूक; दाबोळी विमानतळावर एमडीला अटक

Crypto Currency Fraud:गुंतवणूकदाराची सुमारे २ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी हैद्राबाद गुन्हा शाखेने क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म कॉईन झेडएक्सचे व्यवस्थापकीय संचालक याला अटक केली

Akshata Chhatre

दाबोळी: हैद्राबाद येथील एक गुंतवणूकदाराची सुमारे २ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी हैद्राबाद गुन्हा शाखेने दाबोळी विमानतळ पोलिसांच्या मदतीने क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म कॉईन झेडएक्सचे व्यवस्थापकीय संचालक रवी महासेठ याला अटक केली आहे. अटकेनंतर वास्को प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

घडलेल्या एकूण प्रकरणात हैद्राबाद येथील जितेंद्र नावाच्या एका व्यक्तीला रमेश पुरी नावाच्या माणसाने ज्यादा मोबदला मिलनायचे अमिश दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पडले होते. या अमिषाला बळी पडत जितेंद्रने क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्ममध्ये १.२ लाख रुपये गुंतवणूक केली होती. या क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याला २२ महिन्यांसाठी प्रतिमहिना ११ हजार रुपये परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

यानंतर तक्रारदाराने १.२ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती तसेच परिवार आणि मित्रमंडळींना देखील गुंतवणूक करायला सांगितली होती. या एकूण प्रकरणात तक्रारदारासह एकूण १०० जणांनी २ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातीला चार माहिने तक्रारदाराला परतावा मिळाला मात्र त्यानंतर परतावा मिळणं बंद झाल्याने त्याला त्याची फसवणूक झाली असल्याचं निदर्शनास आलं.

तक्रार नोंदवल्यानंतर हैद्राबाद पोलिसांनी क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मचा व्यवस्थापकीय संचालक रवी महासेठ याच्यासह सहयोगी रमेश पुरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. रवी महासेठ १२ ते १४ तारखेला गोव्यात एक नवीन प्लॅटफॉर्म उघडणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार लुकआऊट सर्क्युलर जारी करत पोलिसांनी दाबोळी विमानतळ पोलिसांच्या मदतीने रवी महासेठ याचं १३ तारखेला मध्यरात्री १ वाजता आगमन झाल्यानंतर पहाटे ४ वाजता त्याला अटक केली आणि त्याला वास्को येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.

संशयित आरोपी रवी महासेठ याने त्याला कोणतीही नोटीस न देता अटक केल्याचा आरोप केला आहे. आणि म्हणूनच त्याने हैद्राबाद न्यायालयात लवकरात लवकर जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला. त्याच्या जामीन अर्जाची दाखल घेत न्यायालयाने त्याला २० हजार रुपयांच्या अटीवर ट्रान्झिट जामीन मंजूर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "गोव्यात येऊन मला आनंद झाला" पी. अशोक गजपती राजू (राज्यपाल)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT