Love Marriage Goa Dainik Gomantak
गोवा

"..समझो हो ही गया"! 2 देश, 2 कायदे...पण अखेर प्रेमच जिंकलं; गोव्याची तरुणी, पोर्तुगीज युवक अडकणार विवाहबंधनात

International Love Marriage Goa Story: दिवाणी न्यायाधीश सारिका फळदेसाई यांनी १९१२च्या ‘कोडिगो दे रजिस्ट्रो सिव्हिल’मधील कलम २४८ अंतर्गत आवश्यक प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सातासमुद्रापार पसरलेली आणि दोन देशांच्या कायद्यांमध्ये अडकलेली एक प्रेमकथा अखेर यशस्वी ठरली. आयर्लंडमध्ये वास्तव्यास असलेला ३६ वर्षीय पोर्तुगीज युवक आणि जुने गोवे येथील ३३ वर्षीय भारतीय युवतीला गोव्यात विवाह नोंदणी करण्यासाठी येथील दिवाणी न्यायालयाने मंजुरी दिली.

दिवाणी न्यायाधीश सारिका फळदेसाई यांनी १९१२च्या ‘कोडिगो दे रजिस्ट्रो सिव्हिल’मधील कलम २४८ अंतर्गत आवश्यक प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश दिले. गोव्यात अद्यापही पोर्तुगीज काळातील काही नागरी कायदे लागू आहेत.

पोर्तुगीज नागरिकांच्या विवाह नोंदणीसाठी या कलमानुसार न्यायालयीन परवानगी आवश्यक असते. हा युवक सध्या आयर्लंडमधील थॉमसटाऊन येथे वास्तव्यास असून त्याच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट आहे.

मात्र, त्यांचा जन्म १९९० साली गोव्यातील सांताक्रुझ येथील एका नर्सिंग होममध्ये झाला असून, त्यांचे मूळ गोव्याशी घट्ट जोडलेले आहे. त्यांची होणारी पत्नी ही जुने गोवे येथील बायंगिणी भागातील रहिवासी आहे.

परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिक यांच्यात विवाह होणार असल्याने न्यायालयीन संमती आवश्यक होती. या प्रक्रियेत पाच स्थानिक साक्षीदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दोघेही अविवाहित असून त्यांच्या विवाहात कोणताही कायदेशीर अडथळा नसल्याची ग्वाही दिली.

सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये पोर्तुगीज पासपोर्ट, ओसीआय कार्ड, जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड आदींचा समावेश होता. या सर्व पुराव्यांवर विश्‍‍वास ठेवून न्यायाधीश फळदेसाई यांनी दोन्ही पक्षांची विवाहासाठी पात्रता सिद्ध झाल्याचे नमूद केले. त्यामुळे दोघांनाही पणजी येथील तिसवाडी दिवाणी निबंधक कार्यालयात विवाहाची अधिकृत नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली.

गोव्यात आजही पोर्तुगीज नागरी कायदा

कोडिगो दे रजिस्ट्रो सिव्हिल (१९१२) अजूनही गोव्‍यात आहे लागू. पोर्तुगीज नागरिकांच्या विवाह नोंदणीसाठी कलम २४८ अंतर्गत न्यायालयीन प्रमाणपत्र आवश्यक. परदेशी व भारतीय नागरिकांतील विवाहासाठी अतिरिक्त कायदेशीर प्रक्रिया बंधनकारक. साक्षीदारांची प्रतिज्ञापत्रे आणि वैध कागदपत्रांवर न्यायालयाचा निर्णय. न्यायालयीन मंजुरीनंतरच दिवाणी निबंधक कार्यालयात विवाह नोंदणी शक्य.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Racing League: थ्रिल आणि ॲक्शन! मोपा विमानतळाजवळ रंगणार 'इंडियन रेसिंग लीग'चा थरार; 6 संघांमध्ये चुरस, 'येथे' पाहता येणार Live streaming

India Economy: भारत होणार श्रीमंत अर्थव्यवस्था! दरडोई उत्पन्न पोचणार 4000 डॉलरपर्यंत; वाचा एसबीआय रिसर्चचा Report

Vande Mataram Cyclothon: 25 दिवसांत 6553 किमीची मोहीम! ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन’चा थरार; तारीख जाणून घ्या..

Goa Latest Updates: 1200 भाविकांना घेऊन खास रेल्वे अयोध्येला रवाना

Arpora Sarpanch: 'हा 25 निष्पाप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला गंभीर गुन्हा', हडफडे सरपंचांच्या जामीन अर्जावर निकाल राखीव

SCROLL FOR NEXT