Crocodile Attack in Goa Dainik Gomantak
गोवा

'मगर घरात घुसली तर आम्ही काय करणार?' आमठाणे मगर हल्ल्यानंतर सासमोळे तलावातील मगरींची परिसरात दहशत

तलावातील मगरी इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि वास्कोमधील तलावाजवळ राहणाऱ्या लोकांसाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.

दैनिक गोमन्तक

Crocodile Attack in Goa: काही दिवसांपूर्वी आमठाणे धरणावर मगरीच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. या घटनेने सासमोळे बायणा येथील तलावात असलेल्या मगरीच्या उपस्थितींकडे लक्ष वेधले आहे. तलावातील मगरी इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि वास्कोमधील तलावाजवळ राहणाऱ्या लोकांसाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.

डिचोली तालुक्यातील आमठाणे धरणावर गेल्या आठवड्यात एका 45 वर्षीय महिलेला मगरीने पाण्यात ओढल्याने तिचा मृत्यू झाला. सासमोळे तलाव हा अमृत सरोवर योजनेंतर्गत सुशोभीकरण आणि पुनरुज्जीवनासाठी सूचीबद्ध केलेल्या जलस्रोतांपैकी एक आहे.

WRD मंत्री सुभाष शिरोडकर यांनी नुकतेच वास्कोमध्ये दिलेल्या भेटीदरम्यान सासमोळे तलावातील मगरींचा उल्लेख केला. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी तलावाभोवती पर्यटन सुविधा विकसित कराव्यात, अशी भूमिका मांडली होती. मात्र तलावात असलेल्या मगरींमुळे लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

याबाबत सासमोळेमधील रहिवासी म्हणाले की, तलावात मगरी असणे हा आमच्याा जीवाला मोठा धोका आहे. आम्ही भीतीने जगत आहोत. चुकून जर मगर घरात घुसली तर काय होईल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आमठाणे धरणावर झालेला हल्ला हा अधिकाऱ्यांसाठी डोळे उघडणारा आहे. त्यामुळे सासमोळे तलावातील मगरी रहिवाशांसाठी आणि प्राण्यांसाठी धोकादायक बनल्याने येथील नागरिक सातत्याने अधिकाऱ्यांकडे मगरीला पकडण्यासाठी आग्रह करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT