Cross Dainik Gomantak
गोवा

शंभरहून अधिक वर्षे जुना क्रॉस हटविल्याने शिवोलीत तणाव

Siolim: वालंकिणी सायबिणीच्या कपेलसमोरचा क्रॉस ग्रामस्थांना विश्वासात न घेता हटविले.

दैनिक गोमन्तक

बामणवाडा-शिवोली येथील वालंकिणी सायबिणीच्या कपेलसमोरचा पुरातन क्रॉस स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता तेथील जमीनमालकाकडून हटविण्यात आल्याच्या कारणावरून रविवारी सकाळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. त्यामुळे शिवोलीत तणाव निर्माण झाला होता. यावेळी ग्रामस्थांनी तो क्रॉस पुन्हा मूळ ठिकाणी न आणल्यास जमीनमालकाविरुद्ध पोलिसात जाण्याचा इशारा दिला आहे.

या भागातील सेंट अँथनी चर्चकडून शिवोली थिएटर जंक्शनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागूनच वालंकिणी सायबिणीच्या कपेलसमोर सुमारे शंभरहून अधिक वर्षे जुना क्रॉस अस्तित्वात होता. रविवारी सकाळी अचानक येथील क्रॉस जागेवरून गायब झाल्याचे लक्षात आल्याने भाविक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमले

दरम्यान, संबंधित जमीन मालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. रस्त्याशेजारची जमीन बिल्डरांच्या घशात घालण्यासाठीच संबंधित जमीन मालकाकडून ग्रामस्थांना विश्वासात न घेता येथील पुरातन क्रॉस हटविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

बामणवाडा - शिवोली येथील त्या जमिनीच्या मालक एलिसिया डिसोझा यांनी तो क्रॉस 1985 सालापासून आपल्याच पूर्वजांनी आपल्या जमिनीत त्यांच्या इच्छेनुसार उभारला होता, आता तो पुन्हा योग्य जागी उभारणार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT