SP Nidhin Valsan visits Banastarim Bridge Accident Site Dainik Gomantak
गोवा

Banastarim Accident: बाणस्तारी अपघाताच्या चौकशीसाठी तपास पथकाची स्थापना; निधीन वाल्सन यांच्याकडे नेतृत्व

तपास पथकाने पार्टीचे ठिकाण आणि बाणस्तरी पूलावरील अपघात स्थळाची पाहणी केली

Rajat Sawant

Investigation Team For Investigate Banastarim Bridge Accident: बाणस्तरी अपघाताच्या चौकशीसाठी क्राईम ब्रांचने पोलिस अधिक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाची स्थापना केली आहे. आज या पथकाने पार्टीचे ठिकाण आणि बाणस्तरी पूलावरील अपघात स्थळाची पाहणी केली.

राज्य सरकारने बाणस्तारी अपघात प्रकरणाचा तपास म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे दिला आहे.

मर्सिडीझ कारने श्रीपाद ऊर्फ परेश सिनॉय सावर्डेकर फोंड्याहून पणजीच्या दिशेने जात होता. यावेळी तो जोडरस्त्यावरून बाणस्तारी पुलाजवळ मुख्य रस्त्यावर येताना या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण गेल्याने ती दुसऱ्या बाजूला गेली.

त्यामुळे फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींसह तीन कारना धडक देऊन कार खांबाला आदळली व पुलाच्या पदपथावर अडकली असे प्रत्यक्षदर्शी वाहनचालकांनी सांगितले. हा अपघात रात्री रात्री आठच्या सुमारास झाला.

या अपघातात तिघांचा बळी गेला होता. अन्य तिघे गंभीर अवस्‍थेत गोमेकॉत उपचार घेत आहेत. उपचार घेणाऱ्यांमध्ये जेष्ठ नागरिक, महिला आणि एका युवकाचा समावेश आहे.

बाणस्तारी अपघातप्रकरणी दिवाडीच्या नागरिकांसह आमदार राजेश फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत हा तपास क्राईम ब्रँचकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती.

प्रकरणाचा तपास म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे देण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणीवेळी दिली होती.

आज पोलिस अधिक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने अपघात स्थळाची पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT