Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहातील ‘त्या’ कैद्याविरुद्ध गुन्हा

तीन दिवसांपूर्वीच प्रदीप याला या कारागृहात दाखल केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Colvale Jail सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी (ता.7) एका कैद्याने तुरुंगातून पलायन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. प्रदीप खाल्को असे या कैद्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात कोलवाळ पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (ता.7) दुपारी 3.10 वाजता घडली होती. प्रदीपला नवीन प्रवेश ब्लॉकमध्ये ठेवले होते. यावेळी ताजी हवा खाण्यासाठी कैद्यांना थोडावेळ बाहेर सोडले जाते.

तेव्हा प्रदीप याने या संधीचा फायदा घेत नवीन प्रवेश ब्लॉकच्या आतील संरक्षक भिंतीवर चढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने तळमज्यावरील छताचा व गेटचा आधार घेतला. परंतु, त्याचा हा प्रयत्न फसला व दक्ष पोलिसांनी त्याला पकडले.

यावेळी तुरुंगाचे नियम मोडल्याप्रकरणी व पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी कैदी प्रदीप खाल्को याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

कारागृहाचे जेलर मुकुंद गावस यांनी कोलवाळ पोलिस स्थानकात याप्रकरणी तक्रार दिली. प्रदीप हा अंडर ट्रायल कैदी आहे. तीन दिवसांपूर्वीच त्याला या कारागृहात दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT