MS Dhoni in Goa Dainik Gomantak
गोवा

MS Dhoni in Goa: IPL 2024 पूर्वी महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसह गोव्यात; फोटो, व्हिडिओ व्हायरल

आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी धोनीचा गोवा दौरा चर्चेत आला असून, त्याचे गोवा ट्रीपचे फोटो व्हायरल होत आहेत.

Pramod Yadav

MS Dhoni in Goa

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पत्नी साक्षीसह गोव्यात आला आहे. धोनीसोबत त्याचे खास मित्र देखील आहेत. धोनीचे गोव्यातील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी धोनीचा गोवा दौरा चर्चेत आला असून, त्याचे गोवा ट्रीपचे फोटो व्हायरल होत आहेत.

महेंद्रसिंग धोनी उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला. धोनीच्या गोव्यात दाखल झाल्यानंतर विमानतळवरील त्याचा व्हिडिओ एक चाहत्याने शेअर केला आहे.

गोवा विमानतळावर धोनी सफेद रंगाच्या शर्ट आणि ब्ल्यु जीन्समध्ये दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील दिसत आहेत.

महेंद्रसिंग धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी धोनी आणि मित्र पूर्णा पटेल, सिमांत लोहानी व इतर मित्रमंडळी दिसत आहेत. धोनी अतिशय कूल अंदाजात गोव्यात निवांत वळ घालवत आहे.

धोनीसाठी आयपीएल सुरु होण्यापूर्वी ही रिफ्रेशमेंट ट्रीप आहे. या वर्षीचा आयपीएल त्याच्यासाठी अतिशय खास असणार आहे. समाज माध्यमांवर होत असलेल्या चर्चांनुसार धोनीसाठी हा अखेरचा आयपीएल हंगमा ठरण्याची शक्यता आहे.

धोनी भारतीय क्रिकेट संघाचा तसेच चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल संघाचा देखील प्रसिद्ध कर्णधार ठरला आहे.

धोनीने त्याच्या क्षमतांनी वेळेवेळी संघाच्या मोठे विजय मिळवून दिले आहेत तर, अनेकवेळा संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले आहे. यावेळी देखील त्याच्या आणि संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT