Sachin Tendulkar
Sachin Tendulkar Dainik Gomantak
गोवा

Sachin Tendulkar: 50 वा वाढदिवस गोव्यात; सचिन तेंडुलकर पत्नी, मुलीसह राज्यात दाखल, पाहा व्हिडिओ

Pramod Yadav

Sachin Tendulkar 50th Birthday: सचिन तेंडुलकर 24 एप्रिल रोजी त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन त्याचा खास दिवसाचा आनंद आपल्या कुटुंबीयांसह गोव्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सचिन तेंडुलकर बर्थडे पार्टी साजरा करण्यासाठी कुटुंबीयांसह गोव्यात दाखल आहे, त्यासाठी तो पत्नी (Anjali Tendulkar) आणि मुलगी सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) गोव्यात पोहोचला आहे.

क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर सोमवारी 50 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यासाठी तो मुंबईहून गोव्यात दाखल झालाय. मुंबईत शनिवारी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रोमांचक सामना झाला, या सामन्यात सचिनही पोहोचला आणि त्याने आपला वाढदिवस संघासोबत साजरा केला.

सचिनने यावेळी स्टेडियममध्ये मोठा केकही कापला. यावेळी त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळत आहे.

पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासह सचिन तेंडुलकरचे काही जवळचे नातेवाईक गोव्यात पोहोचले आहेत. कडेकोट बंदोबस्तात सचिनही गोव्यात पोहोचला आहे. सोमवारी ते गोव्यात वाढदिवस साजरा करणार आहेत.

सचिन तेंडुलकर यांचा जन्म मुंबईतील दादर निर्मल नर्सिंग होममध्ये झाला. सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी त्यांचे नाव संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांच्या नावावर ठेवले. सचिन तेंडुलकरला त्याच्या कुटुंबात दोन मोठे भाऊ आणि एक बहीण आहे.

सचिन तेंडुलकरने 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत 2013 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. 24 वर्षांच्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम केले, जे आजही मोडणे कठीण आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 200 कसोटी (15921 धावा), 463 एकदिवसीय (18426 धावा) आणि 1 टी-20 सामना खेळला. कसोटी आणि एकदिवसीयमध्ये मिळून त्याच्या नावावर शंभर शतकांचा विक्रम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT