IPL 2025 Goa Police Dainik Gomantak
गोवा

IPL Cricket Betting: रात्रभर चालली पोलिसांची कारवाई; कळंगुटमधील आयपीएल सट्टेबाजांना बेड्या

Goa police arrest IPL bettors during CSK vs PBKS match: आयपीएलमध्ये चेन्नई आणि पंजाब यांच्यात सुरु असलेल्या सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या दोघांना गोवा पोलिसांनी अटक केली.

Akshata Chhatre

कळंगुट: सध्या देशात आयपीएलची धूम सुरु आहे. क्रिकेटच्या या महासंग्रामच्या काळात पोलीस अनेक सट्टेबाजी करणाऱ्या टोळ्यांचा देखील पर्दाफाश करत आहेत. मंगळवार (दि. ८) रोजी रात्री उशिरा कळंगुट पोलिसांनी सिकेरी येथील एका अपार्टमेंटमध्ये छापा टाकून आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले. गोवा पोलिसांची ही कारवाई बुधवार (दि. ०९) रोजी पहाटेपर्यंत चालली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक साहिल गोवर्धन वैंगणकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ११:२० ते बुधवार पहाटे ०१:५० वाजेच्या दरम्यान, सन अँड सँड अपार्टमेंटमधील डी ब्लॉकच्या रूम नंबर १०१ मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सुरू असलेल्या टी-२० आयपीएल क्रिकेट सामन्यावर हे आरोपी मोबाईल आणि ऑनलाईन माध्यमातून बेकायदेशीर सट्टा लावत होते.

गोवा पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्यांनी आंध्र प्रदेशमधील दातला (वय.३७) आणि वेजंडला साई बाबू (वय. ३६) या दोघांना अटक केली आहे. सोबतच पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १० नोकिया कीपॅड मोबाईल फोन, एक एचपी लॅपटॉप आणि इतर उपकरणे असा सुमारे ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक साहिल वैंगणकर यांनी कळंगुट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परेश नाईक, पर्वरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश कर्पे आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक आयपीएस अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या घटनेमुळे गोवा पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजीवर मोठी कारवाई केल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT