Pomburpa Dainik Gomantak
गोवा

Pomburpa: खोल विहीरीत पडली गाय, रस्सी लावून सुखरूप काढले बाहेर

बराच काळ विहीत अडकून पडल्यानंतर अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने गाईला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Pramod Yadav

पोम्बुर्फा येथे खोल विहीरीत एक गाई पडली, विहीर आकाराने चिंचोळी आणि खोल असल्याने गाईला आतमध्ये फिरता येत नव्हते. बराच काळ विहीत अडकून पडल्यानंतर अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने गाईला सुखरूप बाहेर काढण्यात आले. रविवारी (दि.०२) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

पोम्बुर्फा येथे सकाळी नऊच्या सुमारास खोल विहीरीत एक गाई पडली असल्याची माहिती पर्वरी अग्निशमन दलाला मिळाली. दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण विहीर आकाराने लहान आणि चिंचोळी असल्याने बचावकार्याला अडथळा येत होता.

अखेर, स्थानिक मदतीला धावले आणि त्यांनी विहीर अडकलेल्या गाईच्या अंगाभोवती घठ्ठ रस्सी बांधली. अर्धा ते पाऊण तासांच्या अथक प्रयत्नानंतर गाईला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

Pomburpa

गाई सुखरूप असली तरी बराच काळ विहीर असल्याने तिच्या शरिरावर किरकोळ जखम झाली आहे. शिवाय विहीर हालचाल होत नसल्याने गाई काहीकाळ अस्वस्थ देखील झाली होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बार्देश येथील गोसेवा पुरविणारी एक सस्वंसेवी संस्था देखील घटनास्थळी दाखल झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT