कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस स्थानिकांचा उत्सवफुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सरपंच पेट्रीक सावियो आल्मेदा यांनी दिली.  Dainik Gomantak
गोवा

Goa COVID19 vaccine: मोहिमेस हणजुणात उत्सफूर्त प्रतिसाद - आल्मेदा  

दीड हजारांहून अधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे शिवोली आरोग्य केंद्राच्या (Shivoli Health Center) अधिकारी डॉ. साधना शेट्ये तसेच हणजुण कायसुवचे सरपंच सावियो आल्मेदा यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

शिवोली: हणजुण पंचायत (Hanjun Panchayat) तसेच शिवोली आरोग्य केंद्राच्या (Shivoli Health Center) संयुक्त विद्यमाने आयोजित कोवीड प्रतिबंधक लसीकरण (Covid preventive vaccination Campaigns) मोहिमेस स्थानिकांचा उत्सवफुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सरपंच पेट्रीक सावियो आल्मेदा (Sarpanch Patrick Savio Almeida) यांनी दिली.

दरम्यान, कोवीड महामारीचे उच्चाटन करण्याच्या हेतूने केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग या नात्याने हणजुण- कायसुव पंचायत तसेच शिवोलीतील आरोग्य केंद्राच्या सहयोगाने गेल्या मार्च महिन्यापासून याभागातील चिवार मैदानात असलेल्या पंचायतच्या सभागृहात टप्याटप्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत दीड हजारांहून अधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे शिवोली आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. साधना शेट्ये तसेच हणजुण कायसुवचे सरपंच सावियो आल्मेदा यांनी सांगितले. यापुढेही कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहीम वर्ष अखेरिपर्यत अठरा वर्षावरील (धर्म- जाती विरहीत ) सर्वप्रकारच्या लोकांसाठी अशाचप्रकारे टप्याटप्याने सुरु राहाणार असल्याचे आल्मेदा यांनी दै. गोमंतकच्या स्थानिक प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

दरम्यान, हणजुण -कायसुव पंचायतीला राज्य सरकारचा ग्राम स्वच्छतेसाठीचा बहुमान याआधीच मिळालेला आहे परंतु या एकाच गोष्टीमुळे हुरळून न जाता हणजुण- कायसुव पंचक्रोशीतील प्रत्येक प्रभागात विकास प्रगतीची छाप जागोजागी दिसून आली पाहिजे आणी म्हणूनच प्रत्येक पंचायत सदस्यांबरोबरच स्थानिक नागरिकांनीही याबाबतीत आपापला खारीचा वाटा उचलण्याची गरज असल्याचे सरपंच आल्मेदा यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, कोवीड महामारीच्या पाश्वभुमीवर राज्यातील पर्यटन व्यवसाय सध्या थंडावलेला आहे परंतु अशा बिकट परिस्थितीत स्वताचा अन्य क्षेत्रातील भाजीपाला तसेच मासळी व्यवसाय सुरू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या स्थानिक तरुणांच्या पाठीशी हणजुण कायसुव पंचायत सदोदीत पाठीशी राहाणार असल्याचे आश्वासन सरपंच सावियो आल्मेदा यांनी दिले. हणजुण -कायसुवच्या स्थानिक मासळी तसेच भाजीपाला मार्केटात अशा तरुणांना व्यवसायासाठी प्रथम स्थान देण्यात येणार असल्याची ग्वाही सरपंच सावियो आल्मेदा यांनी शेवटी दिले.

पेट्रीक सावियो आल्मेदा (सरपंच-हणजुण- कायसुव पंचायत )

कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहीम ही केंद्र सरकारकडून चालविण्यात येत असलेली देशव्यापी मोहीम आहे. देशातील प्रत्येकाने या मोहिमेचा लाभ घेत कोवीडचा नायनाट करण्यासाठी आपला हातभार लावणे काळाची गरज आहे. ही कुणा एका राजकीय पक्षाची खाजगी मक्तेदारी नाही. दरम्यान, कोवीड लसीकरण मोहिमेविरोधात अपप्रचार करणाऱ्या लोकांपासून जनतेने सावध राहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

DA Hike Update: दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते वाढ; मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT