Covid Care Centre  Dainik Gomantak
गोवा

...म्हणून गोव्यात 'कोविड केअर सेंटर' सुरू होणार नाहीत

पहिल्या लाटेदरम्यान, राज्याने अनेक कोविड केअर सेंटर स्थापन केली होती कारण बहुतेक रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी घरी पुरेशी सुविधा उपलब्ध नव्हती.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू असताना देखील राज्य सरकार कोविड केअर सेंटर सुरू करणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Covid Care Centre in Goa Latest News)

"आम्ही यावेळी कोविड केअर सेंटर सुरू करणार नाही आहोत. राज्यातील 96% लोकसंख्येचे लसीकरण (Vaccination) झाले आहे. बेघर लोकांचेही लसीकरण करण्यात आले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," असे आरोग्य सेवा संचालक डॉ. इरा अल्मेडा यांनी सांगितले.

बुधवारपर्यंत, गोव्यातील (Goa) सक्रिय रुग्णांची संख्या 14,000 हून अधिक आहे. पॉझिटिव्हिटी दर 30% पेक्षा जास्त झाला आहे.

पहिल्या लाटेदरम्यान, राज्याने अनेक कोविड केअर सेंटर स्थापन केली होती कारण बहुतेक रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी घरी पुरेशी सुविधा उपलब्ध नव्हती. दुस-या लाटेदरम्यान, रुग्णांचे घरीच विलगीकरण करण्यास प्राधान्य देण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT