COVID-19 Goa Update
COVID-19 Goa Update 
गोवा

COVID-19 Goa Update: अडीच महिन्यानंतर सर्वात कमी रूग्णांची नोंद

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी: गेल्या अडीच महिन्यानंतर गोव्यामध्ये(Goa) दररोजच्या कोविड-19 (Covid-19) रूग्णसंख्येमध्ये सर्वात कमी नोंद झाली आहे.  काही दिवसांपूर्वी राज्यात दररोज 3 हजारांहून अधिक कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. त्या आता या महिन्यात कमी होत आहेत.  सोमवारी राज्यात एकूण 1,695 चाचण्या झाल्या. त्यात 253 नव्या रुग्णांची नोद झाली आहे. एकूण 9 जणांचा मृत्यूची नोंद झाली. यातील चौघांचा मृत्यू गोमेकॉ इस्पितळात, दोघांचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात तर दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात, उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात आणि उपजिल्हा इस्पितळ, फोंडा येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 253 नवीन रुग्णांची नोंद झाली असली तरी सकारात्मकतेचे प्रमाण 14.92 टक्क्यांवर कायम आहे. (COVID 19 Goa reports lowest daily case count from April)

दरम्यान, आता चाचण्यांची टक्केवारी 50 पेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येवरही परिणाम झाला आहे. पावसाळा लागल्यामुळे लोकं कोरोना चाचण्या करणे टाळत असल्याचे आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले. दोन महिन्यानंतर एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या 300 च्या खाली आली आहे. 12 एप्रिल रोजी 476 रुग्ण तर 7 मे रोजी सर्वाधिक म्हणजे 4195 रुग्ण आढळले होते.  

मार्च महिन्यापासून दररोजच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या घटनांमध्ये घट झाल्याने राज्यात दिलासा मिळाला आहे. मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने एकाच दिवसात 75 रूग्णसंख्या नोदविली गेली होती, ही चिंताजनक बाब होती. आता मात्र  गेल्या अडीच महिन्यांनंतर गोव्यामध्ये दररोजच्या घटनांमध्ये सर्वात कमी नोंद झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

SCROLL FOR NEXT