COVID-19 GOA Once Again 15 corona patients died between 2 and 6 A M 
गोवा

COVID-19 GOA: पुन्हा पहाटे 2 ते 6 या वेळेत 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: राज्यात(Goa) 1 ते 13 मे या काळात तब्बल 39078 एवढे कोरोनाबाधित सापडले असून 769 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत 63 जणांचा बळी गेला आहे. ऑक्सिजन(Oxygen) पुरवठ्यातील अनियमितपणामुळे रुग्ण मृत्युमुखी पडतात याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने(High Court of Bombay) घेतल्यानंतरही गुरुवारी पहाटे 2 ते 6 या वेळेत 15 कोरोनाबाधितांचे प्राण गेले आहेत.(COVID-19 GOA Once Again 15 corona patients died between 2 and 6 A M)

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी सरकारतर्फे विविध पावले उचलली जात आहेत. संचारबंदी लागू करण्यात आली आहे. चालू मे महिना हा मृत्यूचे प्रमाण वाढवणारा ठरला आहे. त्याचबरोबर रुग्ण संख्याही चाळीस हजारांकडे पोचली आहे. गेल्या तीन दिवसांत 208 जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. यावरून राज्यात कोरोनाची स्थिती किती गंभीर आहे याची प्रचिती येते.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज 7084 नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2491जण कोरोनाबाधित सापडले. गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या 63 व्यक्तींचे निधन झाल्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 1937 वर पोचली आहे.

विविध ठिकाणचे कोरोना रुग्ण
मडगावमध्ये 2499 कोरोना संसर्गित रुग्ण आहेत. तसेच पणजी - 1827, कांदोळी - 1884, पर्वरी - 1668, कुठ्ठाळी - 1425, फोंडा - 1782, म्हापसा - 1507, शिवोली - 1163 साखळी - 1473, पेडणे - 1290, चिंबल - 1306, कासावली - 1017 संसर्गित रुग्ण आहेत.

प्राणवायू तुटवड्यामुळेच मृत्यू
गोमेकॉ इस्पितळातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारीच स्पष्ट करते की प्राणवायूच्या तुटवड्यामुळेच हे मृत्यू होत आहेत व बळी जात आहेत. दिवसेंदिवस वाढणारी ही आकडेवारी पाहून आम्हालाही दुःख होते. न्यायालय सरकारी यंत्रणेला आदेश देत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहे. मात्र, त्यात कालच्या रात्रीच्या आकडेवारीवरून अपयश आले आहे. त्यामुळे आम्ही लोकांची दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, न्यायालयाकडून यावर उपाय योजण्याचे प्रयत्न सुरूच राहतील, असे गोवा खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले.

...तर जबाबदार धरावे लागेल!
प्राणवायू सिलिंडर ट्रॉली चालविण्यासाठी ट्रॅक्टरचालक तसेच सिलिंडर जोडण्यामध्ये होत असलेल्या तांत्रिक अडचणी यावर तोडगा नाही का? ही समस्या कशी सोडविता येईल? त्यासाठी टेक्निशियन तसेच तज्ज्ञ ट्रॅक्टरचालक नाहीत का? ही कारणे असू शकत नाहीत. या तांत्रिक कारणांसाठी जर कोणाचे जीव जात असल्यास कोणाला तरी जबाबदार धरावे लागेल. न्यायालय या सर्वांमध्ये खोलवर जात नाही. मात्र, लोकांचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. न्यायालय असली कारणे ऐकण्यासाठी नव्हे, तर त्यातून तोडगा काढण्यासाठी आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT